निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी म्हापशात सरकारी संकुलच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यास पत्रकारांना हणजूण पोलिस निरीक्षक प्रशल नाईक देसाई व त्यांच्या सहकारी पोलिसांनी अटकाव केला. राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या समर्थकांच्या लोढ्यांना पोलिसांनी आडकोठी न घरता आतमध्ये जाऊ दिले. पण पत्रकारांच्या बाबतीत भेदभाव केला. त्यांच्याशी हुज्जत घालून गैरवर्तणूक केली. बार्देश पत्रकार संघाने पोलिसांच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. पोलिसांनी आपल्या खाकी वर्दीचा माज लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दाखवू, नये असा इशारा पत्रकार संघाचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी दिला आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने पत्रकारांना निवडणूक कामकाज प्रक्रिया संपेपर्यंत निर्वाचन अधिकार्यांमार्फत तातडीने ओळखपत्रे द्यावीत. शिवाय म्हापशात हंगामी स्वरूपाचा पत्रकार कक्षही उभारण्याची मागणीही त्यांनी केली आहे.