हरमल: येथील केअरिंग सोवल, केशव सेवा साधना, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हरमल व जिल्हा इस्पितळ, म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ह्या शिबिरात ८१ दात्यांनी रक्तदान केल्याचे संयोजक साईदास नाईक यांनी माहिती दिली.
हा कार्यक्रम हरमल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात घेण्यात आला. प्रारंभी जिल्हा इस्पितळ, म्हापशाचे डॉ. पुष्पराज आमोणकर, डॉ. कॅरन रॉड्रिगीस,
गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष हरेश मयेकर, सोवलचे सुभाष वस्त, साईदास नाईक, यशवंत नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आयोजक संस्थेचे सदस्य साईदास नाईक, साईश कोरकणकर, सुभाष वस्त, कल्पेश नाईक, सदानंद दाभोळकर, महेश गोकर्णकर, शनिस देशपांडे, सुनील नानोस्कर, शुभम आश्वेकर, रोहित गोकर्णकर, अथर्व बांधकर, वैभव पै, तनय नाईक यांनी सहकार्य केले. प्रारंभी साईदास नाईक यांनी स्वागत केले.