पार्से:स. प्रा. वि. भटवाडी कोरगांव शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रांजल गणपुले तसेच माजी अध्यक्ष परशुराम गणपुले उपस्थित होते. त्याच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापिका जोसना नानोसकर यांनी प्रास्ताविक केले.
या दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यात इयत्ता तिसरी ची विधाथीनी सानवी सागर नानोस्कर हीने प्रथम क्रमांक पटकावला तर इयत्ता चौथी ची विधाथीनी रेवा रघुनाथ गावडे हीने दुसरा क्रमांक पटकावला. तसेच या वेळी आॅनलाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. कागदापासून फुले तयार करणे वती फूले शाळेत आणून देणे अशा स्वरूपाचे ही स्पर्धा होती. यावेळी माजी विद्यार्थीनी मर्धया नागवेकर व मनस्वी नागवेकर यांनी प्रजासत्ताक दिन या विषयावर सुदंर रांगोळी काढली होती. सुत्रसंचालन सिद्धी कामुलकर तर शर्वरी नाईक यांनी आभार मानले.