कामुर्ली येथील विधाभारती गोवा संचालित पिपल्स हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विधाभारतीचे उपाध्यक्ष दिलिप बेतकेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सचिव पुरूषोत्तम कामत, व्यवस्थापक कमलाकांत वायगणकर, राजेंद्र जोशी, सातेरी प्राथमिक विधामंदीर चे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र नाईक शाळेचे मुख्याध्यापक संदिप पाळणी उपस्थित होते.
सुरूवातीला प्रमुख पाहुणे बेतकेकर यांच्या हस्ते घ्यजारोहण शाळेच्या गानचमुने म्हटलेला ध्यजगीत तसेच समुहगीताने झाले. शारीरिक शिक्षक पांडुरंग पेडणेकर यांनी समारोपाचे संचालन केले. प्रमुख पाहुणे बेतकेकर यांनी सांगितले की विधाथीचे म्हणजेच समाजाचे भविष्य आजच्या कालानुरूप करायचे असेल तर गुगल आणि गुरूजी यांनी बरोबरीने काम केले पाहिजे. अपरंपार माहितीचा खजिना असलेला गुगल गुरूचा विधाथीचा सर्वागीण विकास साधण्याची दृद॑मय ईच्छाशक्ती ठायीं गुरुजींच्या परीस्थीतीरूप उपयोग करून घेतला तरच विधाथी आजच्या आव्हानात्मक परीस्थीतीमधे तग धरू शकतो. ते पुढे म्हणाले की आजचे युग हे माहीती चे युग आहे याचा उपयोग शिक्षक स्वतच्या तसेच विधाथीचा ज्ञानकक्षा रूंदावणासाठी करू शकतो परंतु ही माहिती ज्ञानामध्ये परिवर्तित करून व त्याद्वारे विधाथीनी प्रज्ञावंत करण्याची किमया साधणारा शिक्षकाची साप्रत काळामध्ये समाजाला खरी गरज आहे.
कार्यक्रमाची सुत्रसंचालन स्नेहा नाईक यांनी केले. बीजीट डायस , पुजा शेटये, स्नेहा नाईक गावकर, प्रगती नाईक व करीशमा वायगणकर यांनी गुलाब पुषप देऊन मानववराचे स्वागत केले. शांती पाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.