ब्रह्मेशानंद स्वामी आणि ब्रह्मानंद शंखवाळकर यांचे काँग्रेस नेत्यांनी केले अभिनंदन

.

पणजी: पद्मश्री पुरस्कार प्राप्त सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी आणि भारताचे माजी फुटबॉल कर्णधार ब्रह्मानंद शंखवाळकर यांची शनिवारी काँग्रेस नेत्यांनी भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर, विठू मोरजकर, साईश आरोसकर, तौफिक मुल्लानी, सुनील कवठणकर आणि रवी बोसराजू यांनी तपोभूमी-कुंडई येथे ब्रह्मेशानंद स्वामींची भेट घेतली. तर एल्विस गोम्स, टोनी रॉड्रिगीस आणि दया कारापूरकर यांच्यासह अन्य नेत्यांनी ब्रह्मानंद संखवळकर यांची भेट घेतली.

दिगंबर कामत यांनी ब्रह्मेशानंद स्वामींचे अभिनंदन करून दारूच्या व्यसनाधीन झालेल्या अनेकांचे त्यांनी प्राण वाचवले असल्याचे सांगितले. “यामुळे अनेक कुटुंबांना आनंदी जीवन जगण्यास मदत झाली आहे. ब्रह्मेशानंद स्वामींच्या भेटीनंतर आपल्या जीवनाला चालना देणारी अनेक उदाहरणे गोव्यात आहेत.’’ असे ते म्हणाले.

गिरीश चोडणकर म्हणाले की, दारूचे व्यसन निर्मूलन आणि शांती कोणत्याही दुकानात मिळत नाही, तर स्वामींच्या आशीर्वादाने मिळते. “स्वामींच्या योगदानाची दखल घेतल्याने मला आनंद आहे.” असे ते म्हणाले.

दिनेश गुंडू राव यांनीही यावेळी भाषण केले आणि लोकांना चांगला मार्ग दाखवण्याच्या स्वामीजींच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

ब्रह्मेशानंद सवामीजी म्हणाले की, शांती आणि चांगल्या विचारांसाठी अध्यात्माची वाट धरायला हवी. “सरकारने मला हा पुरस्कार देऊन गोव्यातील जनतेचा सन्मान केला आहे.” असे ते म्हणाले.

पणजीचे काँग्रेस उमेदवार एल्विस गोम्स व इतर नेत्यांनी ब्रह्मानंद शंखवाळकर यांचे अभिनंदन करून त्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या. “शंखवाळकर यांनी क्रीडा क्षेत्रात, मुख्यतः फुटबॉलमध्ये भरीव योगदान दिले असल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला याचा आम्हाला अभिमान आहे.” असे ते म्हणाले.

ताळगावचे उमेदवार टोनी रॉड्रिगीस यांनी यावेळी आपल्या भाषणातून शंखवाळकर यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar