गंस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत कांदोळी समुद्र किनाऱ्यावरील दोन शॅक जळून खाक झाले

.

म्हापसा:गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत कांदोळी समुद्र किनाऱ्यावरील दोन शॅक जळून खाक झाले, या आगीत दोन्ही शॅक्स चे मिळून अंदाजे 45 लाखांचे नुकसान झाले असावे असा अंदाज आहे. ही घटना आज दि.29 रोजी भर दुपारी 11.30 च्या सुमारास घडली.

कांदोळी येथील सांतान फर्नांडिस व मरडवाडा कांदोळी येथील हरीश बागकार यांच्या मालकीच्या या दोन्ही शॅक्स मधील फ्रिज, टेबलं, खुर्च्या, सोफा, बेड्स, दारूच्या बाटल्या, इतर लाकडी सामान, किचन मधील सामान व इतर वस्तू या आगीत जळून खाक झाल्या .
आगीची खबर पणजी अग्निशामक दलास मिळाल्यानंतर त्यांनी पिळर्ण अग्निशामक दलास माहिती दिली, पिळर्ण अग्निशामक दलाचे जवान घटना स्थळी पोहचल्यावर त्यांना आगीची तिव्रता जाणवली त्यांनी त्वरित म्हापसा व पर्वरी अग्निशामक दलास घटना स्थळी पचारण केले. अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी नेण्यास योग्य रस्ता नसल्याने आगीवर नियंत्रण आणण्यास अडथळा आला, तरीसुद्धा दलाच्या जवानांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यत सर्व जळून खाक झाले होते.
पिळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी रुपेश सावंत, जितेंद्र बली, साईश च्यारी, म्हापसा अग्निशामक दलाचे सुरज शेटगावकर, श्याम फडते, रुपेश कळंगुटकर, सनील बाणावलीकर, पर्वरी अग्निशामक दलाचे संदीप नाईक, विदेश म्हापसेकर, महेश माजिक, सुनील नाईक यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे नक्की कारण समजू शकले नसले तरी येथून जाणाऱ्या विजवाहिनीची ठिणगी सिलेंडर वर पडल्याने आग लागल्याचे सांगितले जात असले तरी नक्की कारण शोधून काढण्यासाठी वीज खात्यास कळवण्यात आल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar