स्वतंत्र विचारांचा खरा नेता निवडायचा की रिमोटवर चालणारा याचा निर्णय म्हापसेकरांनी घेतलेला आहे

.

म्हापसा :स्वतंत्र विचारांचा खरा नेता निवडायचा की रिमोटवर चालणारा याचा निर्णय म्हापसेकरांनी घेतलेला आहे. अफाट संपत्ती कामावलेले नेते म्हापसासह बार्देश वर सत्ता गाजवण्याचे स्वप्न पहात आहेत, त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही कारण म्हापसेकरांना कलंगुटमधून रिमोटवर चालणारा प्रतिनिधी नको आहे त्यांना जोशुआ सारखा नेता हवा आहे असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते तथा भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

म्हापसा येथे भाजप उमेदवार जोशुआ डिसोझा यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाट्न फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे, माजी आमदार तथा विद्यमान उमेदवार दयानंद मांद्रेकर, ग्लेन तिकलो, जोशुआ डिसोझा, भाजपचे म्हापसा प्रभारी तथा महाराष्ट्राचे आमदार राम सातपुते, आमदार महेश लांडगे, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, उपन्गराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, इतर नगरसेवक, म्हापसा भाजप मंडळ अध्यक्ष सुशांत हरमलकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोवा हे एक आदर्श राज्य म्हणून भाजप पहात आहे, भाजपला गोव्याचा विकास करावयाचा आहे तर इतर पक्षाना गोव्याचे लचके तोडायचे आहेत. भाजपने केलेला विकास म्हापसेकरांनी पाहिलेला आहे, कोवीड महामारीतही अवघ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात जोशुआ यांनी उत्तम कार्य केले आहे, बाबुश ची परंपरा पुढे नेण्याचे काम जोशुआ करतील यात शंका नाही, याकरिता पुन्हा एकदा जोशुआ यांना निवडून द्यावे असे आवाहन फडणवीस यांनी केले.
यावेळी सदानंद शेटतानावडे, दयानंद मांद्रेकर, शुभांगी वायंगणकर यांनीही आपले विचार व्यक्त करून जोशुआ यांना निवडून आणण्याचे आवाहन केले, तर सुरवातीला जोशुआ डिसोझा यांनी सर्वांचे स्वागत केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar