थिवी परिसरातून चार चाकी व दुचाकी चोरी

.

म्हापसा :थिवी परिसरातून चार चाकी व दुचाकी चोरी प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी जितेंद्र शंकर तोरस्कर (40) पाळनिवाडा, थिवी या अट्टल चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या दोन चारचाकी, पाच दुचाकी व इतर सामान मिळून 6.50 लाखाचा माल जप्त केला.

अधीक माहितीनुसार विनायक कदम रा. चंदगड, कोल्हापूर यांची एमएच 09 FZ 2938 या क्रमांकाची एफझेडएस यामहा मोटरसायकल दि.25 रोजी थिवी येथे पार्क करून ठेवलेल्या ठिकाणाहून चोरीस गेली होती, तशी तक्रार त्यांनी दि.29 रोजी कोलवाळ पोलिस स्थानकात दिली.
दिलेल्या तक्रारीनुसार कळंगुट पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांनी उपनिरीक्षक मंदार परब, सहाय्य्क उपनिरीक्षक रोहिदास नाईक, हवालदार रामा नाईक, पोलीस शिपाई सुलेश नाईक, सजो देसाई यांच्या सह तपास कामास सुरवात केल्यानंतर काही तासातच त्यांना चोरट्याचा सुगावा लागला, चोरीची एफझेडएस घेऊन फिरणारा अट्टल चोरटा जितेंद्र तोरस्कर हा सापडला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याच्या गॅरेजमध्ये आतील बाहेरील वेगळा रंग असलेली बनावट क्रमांकाची एक नॅनो कार, कोणतेही कागदपत्रे नसलेली सफेद रंगाची एक ओम्नी कार, वाहन क्रमांक नसलेल्या तीन हिरो होंडा मोटरसायकल, कोणतेही कागदपत्रे नसलेली एक ऍक्टिवा स्कुटर, वेगवेगळ्या दुचाकीची सात इंजिन्स व दोन मोटर सायकलचे पेट्रोल टॅंक असा मिळून सुमारे रु.650000/- किंमतीचा माल सापडला.
वाहने चोरून ती आपल्या शांतादुर्गा गॅरेज मध्ये आणून त्यात फेरबदल करून ( मॉडिफाय ) त्या वाहनांचा वापर जितेंद्र तोरस्कर हा करीत असे. उपअधीक्षक उदय परब, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar