डीलशेअर’ने केली १६५ दशलक्ष डॉलर्सच्या नवीन वित्तपुरवठ्याची उभारणी; कंपनीचे एकूण मूल्य आता १.६ अब्ज डॉलर्सहून अधिक

.

 

डीलशेअरतर्फे प्रमुख गुंतवणूकदारांकडून ई श्रेणीतील निधी पुरवठा संपूर्ण झाल्याची घोषणा, टायगर ग्लोबल, अल्फा वेव्ह ग्लोबल, ड्रॅगोनिअर इन्व्हेस्टमेंट्स ग्रुप, कोरा कॅपिटल आणि युनिलिव्हर व्हेंचर्स हे विस्तारित वित्तपुरवठा फेरीमध्ये सहभागी
वार्षिक महसुली उत्पन्नाचा धावदर ६०० दशलक्ष डॉलर्सच्या पार
एकूण ग्राहकसंख्येने ओलांडला १० दशलक्षचा टप्पा

बंगळूर, २८ जानेवारी २०२२: तीन वर्षे जुन्या असलेल्या डीलशेअर या ई-कॉमर्स स्टार्टअपतर्फे आपल्या ई श्रेणीतील निधी उभारणीचा पहिला टप्पा सुफळ संपूर्ण झाला असून त्याद्वारे १६५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वित्तपुरवठ्याची उभारणी करण्यात यश आल्याची घोषणा करण्यात आली. कंपनीमध्ये आता ड्रॅगोनिअर इन्व्हेस्टमेंट्स ग्रुप, कोरा कॅपिटल आणि युनिलिव्हर व्हेंचर्स या नवीन गुंतवणूकदारांचे स्वागतार्ह प्रवेश झाला असून त्याखेरीज टायगर ग्लोबल, अल्फा वेव्ह ग्लोबल (फाल्कन एज) या आपल्या सध्याच्या गुंतवणूकदारांसोबत देखील कंपनी बांधिलकी यापुढेही कायम ठेवणार आहे.

कंपनीच्या महसुली उत्पन्नात आणि ग्राहकांच्या संख्येत अतिशय सक्षमपणे वाढ सुरु असून नजीकच्या काळात महसुली उत्पन्न एक अब्ज डॉलर्सचा आकडा साध्य करण्याची अपेक्षा आहे. या फेरीमध्ये उभारणी झालेल्या निधीचा विनियोग तंत्रज्ञान आणि डेटा सायन्समधील गुंतवणुकीसाठी करण्यात येणार आहे; तसेच कंपनीचा भौगोलिक आवाका आणि पोहोच वाढविण्याच्या हेतूने आपल्या दळणवळण पायाभूत सुविधांचा दसपटीने विस्तार करण्यासाठी देखील या निधीचा विनियोग केला जाणार आहे. त्या जोडीला, या निधीच्या उपयोगातून कंपनीतर्फे लक्षणीय संख्येने ऑफलाईन फ्रांचायझी दालनांची साखळी देखील उभारण्यात येणार आहे.

डीलशेअरने भारताकरीता बहुसंख्य जनसामान्य ग्राहकांना परवडण्याच्या दृष्टीने किफायतशीरपणाकडे भर देणारे नवीन विभाजित प्रारूप (मॉडेल) तयार केले आहे. या मॉडेलद्वारे कंपनी गरजेच्या वस्तू आणि उत्पादनांकरीता उच्च दर्जाची, कमी किमतीची पण त्याचवेळी खेळकर, रंजकतेने परिपूर्ण आणि प्रसाराभिमुख अशी खरेदी अनुभूती मिळवून देणार असून त्यायोगे इंटरनेटचा प्रथमच वापर करत असणाऱ्या उपभोक्त्यांना देखील अतिशय सुलभ असा ऑनलाईन खरेदीचा अनुभव मिळेल.

निधी उभारणीच्या या अलीकडच्या फेरीबद्दल बोलताना डीलशेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, विनीत राव म्हणाले, “डीलशेअर ही भारतातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होत असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे. आमचे उत्पन्न ग्राहकसंख्या गेल्या वर्षभरात १३ पटींनी वाढली असून नफाक्षमतेमध्ये सुधारणा झालेली आहे.

दहा दशलक्षांहून अधिक असलेल्या दणदणीत ग्राहकसंख्येसह आम्ही १० राज्यांतील १०० हून अधिक शहरांत भौगोलिक विस्तार साध्य केलेला आहे. आमच्या कंपनीने देशभरात ५००० हून अधिक लोकांसाठी रोजगार निर्मिती करून दिलेली आहे.”

“डीलशेअर दोस्त या आमच्या प्रमुख उपक्रमाअंतर्गत आम्ही एक हजार सामाजिक नेत्यांचे नेटवर्क निर्माण केले असून त्यायोगे अत्यंत कार्यक्षम आणि उच्च मूल्यधिष्टीत पुरवठा साखळीची शाश्वती मिळवू शकलो आहोत. या नवीन निधीचा विनियोग आम्ही नवीन तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करणे, पुरवठा साखळीत अधिक सुधारणा घडवून आणणे आणि देशभरात आमच्या कामकाजाचा आणखी विस्तार करणे या कामांसाठी करणार आहोत. श्रेणीतील सर्वोत्तम गुणवत्तेचे तंत्रज्ञान संपादित करण्यासाठी आणि बहुसंख्य स्तरावर लक्ष्य केंद्रित असणाऱ्या प्रमुख ब्रँड्सचे अधिग्रहण करण्यासाठी देखील आम्ही या निधीचा निधीचा उपयोग करून घेणार आहोत,” असे राव यांनी पुढे नमूद केले.

टायगर ग्लोबलचे भागीदार ग्रिफिन श्रोडर म्हणाले, “डीलशेअर अतिशय वेगाने वृद्धिंगत होत असून आपल्या नाविन्यपूर्ण सोशल कॉमर्स धोरणाचा सुयोग्य वापर करून घेणाऱ्या आपल्या सक्षम नेतृत्व टीमच्या सहाय्याने कंपनीने प्रशंसनीय ग्राहकसंख्या प्राप्त केलेली आहे. कंपनी टीअर टू आणि टीअर थ्री शहरांत कार्यविस्तार करण्याच्या मार्गावर असताना डीलशेअरमध्ये निश्चितपणे भारतात ई-कॉमर्समधील एक नवीन प्रवाहाची लाट निर्माण करण्याची ताकद सामावलेली आहे.”

कंपनीच्या विकास विषयक वाटचालीबद्दलच्या दृष्टीकोनाविषयी बोलताना डीलशेअरचे संस्थापक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी सौर्ज्येंदू मेड्डा म्हणाले, “आमच्या व्यवसायात खूप मोठी वाढ होताना आम्ही बघत आहोत. यावर्षी, आम्ही २० राज्यांतील २०० हून अधिक शहरांमध्ये आमचा कार्यविस्तार करणार असून कार्यात्मक दृष्ट्या फायदेशीर बनण्यासाठी आमचा वार्षिक महसूल दर ३ अब्ज डॉलर पर्यंत वाढविण्याचे धाडसी ध्येय आम्ही समोर ठेवले आहे. आगामी १२ महिन्यात साधारण ५० दशलक्ष नवीन ग्राहक जोडून घेणे हेही आमचे उद्दिष्ट आहे.”

“सर्वसामान्य ग्राहकांसाठी कमी किंमतीत उच्च दर्जाची उत्पादने मिळण्याची क्षमता वाढविणे हे आमचे ध्येय आहे. आमचे ध्येय साध्य करण्यासाठी किराणा आणि आवश्यक क्षेत्रातील १००० हून अधिक छोट्या आणि मध्यम उत्पादकांचे वैशिष्ट्यपूर्ण नेटवर्क आम्ही तयार केले आहे. आमचे बहुसंख्य ग्राहक केवळ आमच्यामुळे पहिल्यांदाच इ-कॉमर्सवर आले आहेत. देशात इ-कॉमर्सचा अंगीकार करण्यासाठी केवळ आम्ही नेतृत्व करत आहोत असे नाही तर ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करून आम्ही हे करत आहोत,” असेही सौर्ज्येंदू मेड्डा म्हणाले.

डीलशेअरचे कार्यक्षेत्र असणाऱ्या १० राज्यांमधील १०० हून अधिक गोदामांमध्ये त्यांचे काम सुरु असून पुढील १२ महिन्यात आजच्या २ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रापासून २० दशलक्ष चौरस फुटांपर्यंत गोदामांचा विस्तार करण्याची योजना आहे.

अल्फा वेव्ह ग्लोबलचे सहसंस्थापक आणि भागीदार नवरोज डी. उदवाडिया म्हणाले, “या फेरीत गुंतवणूक करताना आम्हांला खूप आनंद होत आहे आणि डीलशेअरला असलेला आमचा पाठिंबा सुरूच आहे. डीलशेअरचे ग्राहक हे स्थानिक/प्रादेशिक उत्पादनांची आवड असणारे टायर २ आणि ३ शहरांत राहणारे पैसे मोजूनमापून वापरणारे मध्यमवर्गीय भारतीय आहेत. डीलशेअर आपल्या ग्राहकांना आकर्षक मूल्यवर्धित सेवा सादर करत आहे.”

विनीत राव, सौर्ज्येंदू मेड्डा, संकर बोरा आणि रजत शिखर यांनी २०१८ मध्ये स्थापन केलेल्या डीलशेअर तर्फे अत्यंत वाजवी किंमतीत सुस्पष्ट आणि काळजीपूर्वक, विचारपूर्वक वर्गीकरण पुरविले जाते आणि एकत्रितपणे सर्वोत्तम अर्थकारणाला गती देत अगदी कमी किंमतीत डिलिव्हरी यंत्रणा कार्यान्वित करून नाविन्यपूर्ण समाजाभिमुख नेतृत्व उभारणी केली जाते. रिटेल आणि ग्राहक तंत्रज्ञान यामध्ये प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या उद्योगजगतातील आघाडीच्या नेत्यांना सहभागी करून घेत डीलशेअर आपल्या वरिष्ठ नेतृत्वाला चालना देत आहे.

अॅव्हेंडस हा या व्यवहारासाठीचा एकमेव आर्थिक सल्लागार आहे.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar