म्हापशातील काँग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकर यांना १२० महिलांचा पाठींबा, आज केला काँग्रेसमध्ये प्रवेश
म्हापसा:-म्हापसा मतदारसंघातील सुमारे १२० युवती व महिलांनी काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांना आज सायंकाळी उतरगोवा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पाठींबा देण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात विविध पार्टीच्या युवती व महिला वर्ग होत्या. त्यांना महीला अध्यक्ष बिना नाईक यांनी प्रवेश दिला.
यावेळी उपाध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर,
म्हापशाचे उमेदवार सुधीर कांदोळकर उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, म्हापसा गटाध्यक्ष अँड. शशांक नार्वेकर, नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर,अन्वी कोरगावकर, कोमल डिसोझा, माजी नगरसेविका अँड. मधुमिता नार्वेकर, सोनल माळवणकर, प्रतीक्षा खलप, व इतर पधादिकारी उपस्थित होते.
काँग्रेसच्या महिला अध्यक्ष बिना नाईक यांनी बोलताना सांगितले की, गोव्यातील महिलामध्ये एवढी ताकत आहे की, त्या गोव्याचे राजकारण कधीही बदलू शकतात. भाजपाने महागाई वाढविल्याने महिलांना आपल्याकडे एकही पैसा ठेवता येत नाही. महागाईने लोकांचे भाजपाने कंबरडे मोडून टाकले. या सरकारने इकोनॉमिकीस २७ कोटी कर्ज रूपाने करून ठेवल्याने प्रत्येक वक्ती मागे दीड कोटींचा बोज्या आहे. कोविडणे मरण पावलेल्याना अडीच लाख देण्याचे आश्वासन देऊन त्यांना थोडी रक्कम देऊन फसवणूक करत असतानाच एकप्रकारे थट्टा केली. आजच्या महिला हुशार आहेत. त्या या निवडणुकीत सुधीर कांदोळकर या म्हापशातील काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणतील अशी आशा वक्त केली.
तर उपाध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर यांनी बोलताना सांगितले की, गोव्यात वाढत असलेल्या क्राईमला भाजप पक्ष व त्यांचे सरकार जबाबदार आहे. आजच्या युवती, महीला सुरक्षित नाही. त्यांना रस्त्यावरून एकटे चालत जाताना भीती वाटते. भाजप पक्ष आवाज खूप करतात म्हणून लोक आता बदलणार नाही. आणि मतेही घालणार नाही. आता काळ पूर्वीसारखा राहिला नाही तो बदलत जात आहे. त्यामुळे ही आगामी विधानसभा निवडणूक भाजपला जड जाणार असल्याचे ते म्हणाले.
म्हापसा गटाध्यक्ष अँड शशांक नार्वेकर यांनी सांगितले की,२०१७ च्या जाहीरनाम्यात तत्कालीन उमेदवारांनी आपण निवडून आल्यावर प्रत्येक टिट्यावर सीसी टीव्ही लावणार असल्याचे आश्वासन दिले होते पण ते काम एकाही ठिकाणी झाले नसल्याचे नार्वेकर म्हणाले. त्यामुळे कॉलेजच्या मुलींना व इतर महिलांना स्ववरशण मिळत नाही. हे आताच्या आमदाराला लोकांनी विचाराण्याची गरज आहे. विजेची सोय, गटार व्यवस्था, फुटपाथ हे लोकांना मिळत नसतील तर काय उपयोग आहे. आणि हे असले पुन्हा निवडून आल्यास पाच वर्षे काय करतील असा उपस्थित केला.गृहलक्षिमीच्या नावे महिलांना सहा सात महिने पैसेच दिले नाही. प्रत्येक महिलांनी प्रचारासाठी येणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला यांचा जाब विचारण्याची आज पाळी आलेली आहे. असे नार्वेकर म्हणाले.
तर विजय भिके म्हणाले की, संसारात व रजकारणात महिलांचा वाटा महत्वाचा आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महिलांनी काँग्रेसला मते मारून सुधीर कांदोळकर यांना विजयी करण्यासाठी पुढे आले पाहिजे. गोव्यात यावेळी काँग्रेसचे सरकार असणार त्यात सुधीर कांदोळकर हे महीला व बालकल्याण असतील असे भविष्य वर्तविले.
नगरसेवक तथा काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांनी सांगितले की, भाजपच्या म्हापशातील आमदाराने लोकांना अनेक आश्वासने दिली. पण आपल्या कारकिर्दीत काहीच केले नाही. कदंब बस स्थानकाचा एक टेलर म्हणून शेड बांधली त्या जागी मल्टी पर्पज बस स्थानक प्लॅन आहे. लोकांच्या डोळ्यावर धूळ फेकण्याचे काम त्यांनी केले. भाजपाने नोकऱ्या देऊन लाखो रुपये गोळा केले. म्हापशाचा विकास म्हणजे आपल्या नावाची पाटी लावण्याचे काम त्यांनी केले आहे. असे कांदोळकर म्हणाले. यावेळी माजी नगरसेविका अँमधुमिता नार्वेकर यांनी आभार मानले. या पत्रकार परिषदवेळी १२० युवती व महिलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.