विनोद पालयेकर यांना शिवोलीत वाढता पाठींबा

.

म्हापसा :दांडा तसेच गुडेवासियांना भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईची मला जाण आहे त्यामुळेच याभागात नवीन पाईपलाईनची उभारणी करण्यात आली होती तरी काही कारणाने गुडेवासियांना नियमितपणे सुरळीत पाण्याचा पुरवठा करण्यास अपयशी ठरल्याबद्दल माफी मागतो असे शिवोलीचे माजी आमदार तथा माजी जलस्रोत मंत्री आणी विद्यमान अपक्ष उमेदवार विनोद दत्ताराम पालयेंकर यांनी गुडे, शिवोलीत सांगितले.
यावेळी गुडेतील श्रीदेव काळोबा यांचे पालयेंकर यांनी आपल्या समर्थकांसमवेत दर्शन घेतले. गोवा फॉर्वार्डकडून पक्षाचे तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पालयेंकर यांनी प्रचाराचा जोर वाढवला असून आपल्याला जागोजागी मतदारांचा उत्साही प्रतिसाद मिळत असल्याचे पालयेंकर यांनी रविवारी गुडे येथे सांगितले.
शिवोली मतदार संघचा आमदारम्हणून निवडून आल्यानंतर याभागातील विकास कामांवर आपण लक्ष केद्रीत केले होते त्यानुसार संपुर्ण मतदार संघात नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या सहकार्याने मतदारसंघातील रस्त्यांसाठी पंचाहत्तर कोटी रुपये मंजूर करून घेण्यात यशस्वी ठरलो होतो. दुर्दैवाने, पर्रीकरांच्या निधनानंतर मंत्रीपद गेले आणी मंजूर करून घेण्यात आलेल्या विकास कामांच्या कार्यात स्थानिक प्रस्थापित राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढल्याने त्यांमध्ये खंड पडला आणि कामे रखडून पडल्याची खंत पालयेंकर यांनी यावेळी बोलून दाखविली.
आपण मंत्रीपदी असतांना महत्वाची अशी जलस्त्रोत, मच्छीमार आणी वजन व माप खाते आपल्याकडे होते त्याद्वारे स्थानिक तसेच अन्य सुमारे दीड हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यात सामावून घेणे शक्य झाले असते परंतु मंत्रीपद गेल्यानंतर राजकीय सहकार्य न मिळाल्याने बेकारीवर तोडगा काढणे शक्य झाले नाही असे पालयेंकर यांनी सांगितले.
शिवोलकरांनी पुन्हां एकदां विधानसभेवर जाण्याची संधी दिल्यास निश्चितच अपुर्णावस्थेतील सर्व विकास कामे पुर्ण करण्यास बांधील राहाणार असल्याचे शेवटी विनोद पालयेंकर यांनी सांगितले. यावेळी आपल्या समर्थकांसहित दांडा तसेच गुडेतील घरोघरी जाउन पालयेंकर यांनी प्रचार केला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar