विश्वासघात केलेल्या भाजपला लोक पराभूत करतील: नाना पटोळे

.

 

पणजी : भाजपने प्रत्येक क्षेत्रात राज्यातील लोकांचा विश्वासघात केलेला असून, कोव्हिड काळांत लोकांचा प्राण काडून घेतला, यासाठी या पक्षाला लोक पराभूत करणार असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे यांनी बुधवारी म्हटले.

पटोळे यांनी बुधवारी पणजीत पत्रकार परिषद घेवून भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर उघड झाला आहे असे ते म्हणाले.

काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर, एआयसीसीचे निरीक्षक मनोज त्यागी, अॅड. श्रीनिवास खलप, तौफिक मुल्लाणी यावेळी उपस्थित होते.

“भाजपच्या गैरकारभारामुळे गोव्यातील जनता त्रस्त झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात लोकांना त्रास सहन करावा लागला आहे, त्यामुळे मतदार भाजपचा पराभव करून काँग्रेसला निवडून देतील.” असे ते म्हणाले.

“भाजप सरकारने कोविड रूग्णांची हत्या केली, त्यासाठी त्यांना जबाबदार धरले पाहिजे आणि मला खात्री आहे की गोव्यातील लोक त्यांचा पराभव करतील.” असे पटोळे म्हणाले.

भाजपने राज्यातील खनिज व्यवसाय बंद केल्याचा आरोप त्यांनी केला. “भाजपने खनिज व्यवसाय बंद करून लोकांना त्रास दिला. तसेच भाजप सरकारने आरोग्य क्षेत्रातही भ्रष्टाचार केला आहे.’’ असे ते म्हणाले.

पणजीची जागाही काँग्रेसच जिंकेल, असे ते म्हणाले. “आम्ही उदय मडकईकर (माजी महापौर) यांना भेटलो आहे आणि आम्हाला विश्वास आहेत ते आमच्यासोबत राहणार. पणजीशिवाय शेजारच्या मतदारसंघातही ते आम्हाला मदत करतील.’’ असे पटोळे म्हणाले.

नाना पटोळे म्हणाले की, ते साखळी मतदारसंघामध्ये प्रचारासाठी घरोघरी फिरले असता त्यांना कळाले की जनता भाजपवर नाराज आहे आणि त्यांचा पराभव नक्की करणार. “लोक मला सांगत होते की मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, ज्यांच्याकडे राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात एकच वॅगन-आर गाडी होती. त्यांनी संपत्ती कशी मिळवली हे लोकांना माहीत आहे आणि भाजपविरोधातील हा राग त्यांना घरी पाठवेल. ” असे ते म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar