२७ जानेवारी २०२२ रोजी माजी मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून घर घर चलो प्रचार अभियानास सुरुवात केली उत्स्फूर्त प्रतिसाद

.

पार्सेकर यांच्या घर घर चलो अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघातील कार्याला दिवसेंदिवस भरगोस प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी होणार अशी चर्चा सबंध मांद्रे मतदारसंघात सध्या सुरू आहे.

२७ जानेवारी २०२२ रोजी पार्सेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून घरघर चलो प्रचार अभियानास सुरवात केली. अपक्ष उमेदवार या नात्याने घरोघरी त्यांना योग्य मान व सन्मान मिळत आहे. मतदारसंघातील जनता आपल्या समस्या व्यक्त करताना मांद्रे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा विधानसभेत पाठवू असे निर्भीडपणे सांगतात. मतदार संघातील वाढत्या समस्या दूर करण्यासाठी व पार्सेकर यांच्या काळात होऊ घातलेले लोकाभिमुख मेगा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अपक्ष उमेदवार पार्सेकर हा एकमेव पर्याय असा संदेश सबंध मतदारसंघात वेगाने पसरत चालला आहे.

निवडणूक जवळ असल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या बळावर घरघर चलो अभियानादरम्यान ते दररोज ३ बूथ फिरून लोकांच्या समस्या जाणतात, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अशक्यप्राय गोष्ट शक्य केली आहे, त्यांच्या प्रचाराचा वेग पाहता पार्सेकर यांचा विजय निश्चित आहे.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar