1:37 येत्या पाच वर्षात आम आदमी पक्ष शिवोली मतदार संघचा सर्वागीण विकास करून दाखवेल :ऍड. विष्णू नाईक

.

उमेदवार निवडून आल्यानंतर पक्षांतर करतात जसे शिवोलीच्या आमदाराने गेल्यावेळी केले पण आपण निवडून आल्यानंतर कधीही पक्षांतर करणार नाही, तसे आपण शपथपत्रावर लिहून दिले आहे, दिल्लीतील निवडून आलेल्या कोणत्याही आमदाराने पक्षानंतर केलेले नाही अशी माहिती शिवोली मतदार संघातील आप चे उमेदवार विष्णू नाईक यांनी यांनी दिली.

राज्यातील जनता भाजप तसेच कॉग्रेसच्या भुलथापांना कंटाळली असून येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्यांचा पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाला सत्तेवर आणण्याचा निर्धार गोमंतकीय जनतेने केला आहे. शिवोलीत सतत वीस वर्षे सत्तास्थानी राहिलेल्या भाजपने शिवोलीची अवस्था मागासलेल्या मतदार संघापेक्षाही वाईट करून ठेवली आहे त्यामुळेच शिवोलीतून यंदा आम आदमी पक्षाचा उमेदवार विजयी असल्याचा विश्वास या पक्षाचे शिवोलीतील उमेदवार एड. विष्णु नाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी अवीन फोन्सेका व इतर उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करणाऱ्या दांडा तसेच गुडेतील रहिवाशांची समस्यां आम आदमी पक्ष प्रामुख्याने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तसेच मतांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या विष्णु नाईक यांनी आपण 2017 च्या निवडणुकीत पराभव होऊंनही सदोदित लोकांच्या संपर्कात होतो असे सांगितले तसेच वीज पाणी यासारख्या प्रश्नांवरून वेळोवेळी ग्रांमस्थांच्या बरोबरीने आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. भाजपचे सरकार जनतेला एकाबाजूने डिजीटल इंडियाची स्वप्ने दाखवत आहे तर दुसऱ्या बाजूने राज्यातील बहुतेक गावांत नेटवर्कची सोय नसल्याने शाळा-हायस्कुलातील विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासक्रमात मागे पडत असल्याचे चित्र दिसते आहे त्यामुळे आम आदमी पक्षाला राज्यात सरकार स्थापनेची संधी मिळाल्यास गोव्याच्या कानाकोपऱ्यात सर्वप्रथम सुरळीत नेटवर्कींग सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar