कळंगुटमध्ये जे नवीन हॉटेल व्यावसायिक येऊ पाहतात, त्यांनी ३० टक्के कमिशन थेट नागरिकांसाठी द्यावे. जेणेकरून या पैशांतून लोकांना मोफत फ्लॅट्स मिळण्यास मदत होईल, असा दावा बागा, कळंगुट येथील प्रसिद्ध उद्योजक रिकार्डो डिसोझा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. रिकार्डो डिसोझा हे कळंगुट मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. बागा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र दिवकर हे हजर होते.
कळंगुट मतदार संघ हा मतदारसंघ १० हजार कोटींचा असून, याठिकाणी मोठमोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आहेत. यापूर्वी अनेक व्यावसायिकांनी भरभरुन पंचायत तसेच इतर प्रशासनाला पैसे दिले आहे. मात्र, याचा काडीचा फायदा स्थानिकांना किंवा गावाला झालेला नाही. यापुढे थेट स्थानिकांना नफा मिळावा यासाठी नवीन हॉटेल व्यावसायिकांना थेट ३० टक्के कमिशन हे लोकांसाठी द्यावे. यातून लोकांना फ्लॅट्स किंवा रुम भेटेल. आणि जे देणार नाहीत, त्यांना कळंगुटमध्ये परवानगी मिळणार नाही, असेही रिकार्डो म्हणाले.
पंचायत मोठ्या स्वरुपात कर गोळा करते. आणि या पैशांतून हायमास्क वैगेरे खरेदी करते. मात्र, पाच लाखाचे हे हायमास्क २० लाखात विकत घेते, मात्र ते पेटत सुद्धा नाहीत. अशाप्रकारे करदात्यांच्या पैशांची नासाडी होते. मुळात हे पैसे लोकांचे वीज, पाणी बिल किंवा मुलांच्या शालेय शुल्क भरण्यास वापरता येईल, असेही रिकार्डो डिसोझा म्हणाले.
मुळात जे हॉटेल किंवा रेस्टॉरंट्स येतात, ते अप्रत्यक्षरित्या वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषणाला चालना देतात व याचा विपरित त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे या लोकांना थेट स्थानिकांच्या कल्याणासाठी ३० टक्के कमिशन स्वरुपात पैसे द्यावेत. ज्या निधीतून लोककल्याणास मदत मिळेल आणि हाच माझा जाहिरनामा असल्याचे रिकार्डो म्हणाले.
मध्यंतरी मी एका राष्ट्रीय पक्षाच्या तिकिटासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, माझे हिंतचिंतक व कार्यकर्ते माझ्या या निर्णयाच्या विरोधात होते. कारण, या पक्षाबद्दल लोकांमध्ये प्रचंड चिड व विरोध असल्याने लोकहितार्थ मी नंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे रिकार्डो यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले.दरम्यान, आजही स्थानिक टॅक्सीवाले व गेस्ट हाऊस मालकांचे अनेक प्रश्न खितपत पडलेले आहेत. ते सोडविण्यासाठी मी रिंगणात उतरलो आहे, असेही ते म्हणाले.
कळंगुट मधून निवडणुकीसाठी रिकार्डो डिसोझा सज्ज
.
[ays_slider id=1]