गोव्यात काँग्रेसची लाट दिसत आहे: कामत

.

 

पणजी : विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गुरुवारी सांगितले की, लवकरच काँग्रेस पक्षाची लाट येईल आणि ते स्थिर सरकार स्थापन करणार.

काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या समर्थकांचे स्वागत केल्यानंतर कामत बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, जीपीसीसीचे मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, विजय भिके, ॲड.श्रीनिवास खलप, तन्वीर खतीब आदी उपस्थित होते.

साळगाव येथील पिळर्ण सिटिझन फोरमचे अध्यक्ष आणि गोवा फॉर्वऱड्चे माजी गटाध्यक्ष प्रकाश बांदोडकर आणि त्यांचे समर्थक, माजी आप नेते संदिप पेडणेकर, प्रगती पेडणेकर आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गोव्यातील जनतेने ठरवायचे आहे की त्यांच्यासाठी कोणता काळ चांगला होता, काँग्रेसचा काळ की आता भाजपचा. आम्ही लोकांच्या हितासाठी काम केल्यामुळे लोक नक्कीच काँग्रेसच्या बाजूने उभे राहत आहेत, असे कामत म्हणाले.

महाराष्ट्राचे माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी भाजपवर जोरदार टिका करताना म्हटले की, हा पक्ष अल्पसंख्याकांना न्याय देण्यात अपयशी ठरला आहे.

“गोव्यातील भाजप सरकार अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्यात अपयशी ठरला. भाजपच्या राजवटीत गोव्यातील प्रत्येकजण त्रस्त आहे. कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. गोव्याची प्रगती थांबली आहे. त्यामुळे गोव्यातील जनता भाजपला सहन करणार नाही.” असे ते पुढे म्हणाले.

“काँग्रेस पूर्ण बहुमत मिळवेल आणि स्थिर सरकार स्थापन करेल.” असे ते म्हणाले.

अमरनाथ पणजीकर म्हणाले की, गोव्याचे संरक्षण आपणच करू शकतो, हे माहीत असल्याने लोक काँग्रेसकडे आकर्षित झाले आहेत.

“आम्ही कधीच गोव्याच्या जनतेवर कोणताही प्रकल्प लादलेला नाही. लोकांना विश्वासात घेऊन आम्ही प्रगती केली आहे.” असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना प्रकाश बांदोडकर म्हणाले की, भाजपने सर्वांवर अन्याय केला आहे, त्यामुळेच त्यांना काँग्रेसमध्ये जाण्यास भाग पाडले. प्रकाश बांदोडकर आणि प्रगती बांदोडकर म्हणाले की, ते गोव्याच्या हितासाठी काम करू आणि काँग्रेसला मजबूत करू.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar