हणजूण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत एका केरळ च्या युवकास अटक करून एक लाख 80 हजार किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला

.

 

हणजूण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत एका केरळ च्या युवकास अटक करून एक लाख 80 हजार किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला.ही कारवाई दि.3 रोजी पहाटे 2.45 ते 5.15 या वेळेत करण्यात आली.
हणजूण पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिलेल्या माहिती नुसार शिवोली येथील श्री स्वामी समर्थ मठाजवळ अंमली पदार्थ विक्री होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज देविदास, उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक, पोलीस शिपाई गोदीश गोलतेकर, महेंद्र मांद्रेकर, किसन बुगडे, आणी शंबा शेटगावकर यांनी स्वामी समर्थ मठाजवळ सापळा रचला असता चार्ल्स मारझल डेनिस (25) मूळ रा. केरळ सध्या रा. हनुमान मंदिर, गुडे, शिवोली हा युवक त्या ठिकाणी येऊन संशयास्पद रित्या घुटमळू लागला, हणजूण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याचेकडे 5.26 ग्राम वजनाचा एमडीएमए हा (160000/- किंमतीचा ) अंमली पदार्थ तसेच 0.96 ग्राम एकस्टासि हा अंमली पदार्थ (अंदाजे किंमत रु.29 हजार ) सापडला.
हणजूण पोलिसांनी पंचनामा करून अंमली पदार्थ जप्त केला व चार्ल्स डेनिस याचे विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद करून अटक केली, त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar