आगामी विधानसभा निवडणुकीसाठी म्हापसा मतदारसंघातून तृणमूल कॉंग्रेस – मगो युतीचे उमेदवार एड.तारक आरोलकर यांनी मतदारसंघातील युवकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. एड.आरोलकर यांचा म्हापसात सध्या प्रचार सुरू असून त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.आज त्यांनी म्हापासात प्रभाग क्रमांक २० मध्ये प्रचार केला.
गोव्यासह म्हापसातही युवकांच्या अनेक ज्वलंत समस्या प्रलंबित आहेत. त्यात रोजगार हा प्रमुख मुद्दा आहे.
गेल्या पाच वर्षात बेकारीत वाढ झाली आहे. परंतु, सरकारात असूनही म्हापसाच्या आमदारांना नोकर्या देता आलेल्या नाही. तसेच रोजगार निर्मिती करणारा एकही प्रकल्पही मतदारसंघात आणलेला नाही. यावरून युवकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेकांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत.तर, काही जणांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. त्यात पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या जवळ असल्याने युवा वर्ग त्रस्त आहे.सरकारी नोकरभरतीतही भ्रष्टाचार आणि मक्तेदारीपणा होत असून योग्यतेनुसार नोकर्या दिल्या गेलेल्या नाही. त्यात म्हापसातील युवकांवर सुद्धा अन्याय झाल्याचे त्यांनी एड.आरोलकर यांना सांगितले.
यावेळी एड.आरोलकर यांनी तृणमूल कॉंग्रेस – मगो युतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केलेल्या आश्वासनांची आठवण युवकांना करून दिली. पक्षाने दोन लाख रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले आहे. या अंतर्गत सरकारी नोकर्या योग्यतेनुसार दिल्या जाईल.दहा हजार सरकारी नोकर्या तीन वर्षात दिल्या जाणार आहेत. तसेच नवीन प्रकल्प आणून रोजगार निर्मिती देखील केली जाणार आहे. त्या व्यातिरिक्त खासगी क्षेत्रातही रोजगार युवकांना मिळणार याचे नियोजन करण्यात आले आहे, असे एड.आरोलकर यांनी युवकांना सांगितले.
युवा शक्ती योजना सरकार स्थापित झाल्यानंतर सुरू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत युवकांना २० लाख रुपयेपर्यंत ४ टक्के व्याजदरावर कर्ज मिळणार आहे. जीडीपी सहा टक्के वाढवण्यावर भर दिला जाईल, सध्या ०.७१लाख असून हा १.८० कोटी नेण्याचे लक्ष्य आहे. वार्षिक दरडोई उत्पन्न ११लाख रुपये करण्याचे लक्ष्य आहे. दिलेल्या सर्व आश्वासने तृणमूल – मगो युती सत्तेत आल्यानंतर पूर्ण करणार असल्याचे एड.आरोलकर यांनी यांनी युवकांना सांगितले.