सम्राट क्लब हळदोणा व श्री सातेरी भगवती मंदीर यांच्या संयुक्त विद्यमाने देवस्थान च्या सभामंडपात हळदीकुंकू समारंभ पार पडला.
सुरुवातीला सम्राट क्लब चे संस्थापक नंदकुमार रायकर यांनी दिप प्रज्वलित करून कायक्रमाची सुरवात केली. नीता रायकर यांनी कार्याचे महत्त्व उपस्थित महिलांना पटवून दिले. प्रथम देवीला वाण देऊन हळदीकुंकू समारंभ पार पडला. सचिव सवैश रायकर यांनी प्रास्ताविक केले. सम्राट क्लब हळदोणा अध्यक्ष रवींद्र पणजीकर यांनी मकरसंक्रांतीचे महव सागितले. प्रकल्प अधिकारी म्हणून नीता रायकर व सहाय्यक अधिकारी म्हणून राधा पेडणेकर यांनी काम पाहिले. सुरज पेडणेकर, मंगल हळदोणकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्य केले. सवैश रायकर यांनी आभार मानले.