गेली पंचवीस वर्षे विकासापासून वंचितावस्थेत राहिलेल्या शिवोली मतदार संघात खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी एकदाच आम आदमी पक्षाला संधी देण्याचे आवाहन पक्षाचे उमेदवार अड. विष्णु नाईक यांनी केले. शिवोलीतील मधलेभाट परिसरात आपल्या समर्थकासमवेत प्राचार करतेवेळी विष्णू नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गेली पंचवीस वर्षे शिवोलीचे प्रतिनिधित्व कलेल्या दयानंद मांद्रेकर यांना याआधीच जनतेनेच नाकारलेले आहे परंतु गेली पाच वर्षे शिवोलीचा पदभार सांभाळलेल्या आमदार विनोद पालयेंकर यांना त्यांच्याच पक्षाकडून यंदाची तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांची निष्क्रियता सिद्ध झाली असल्याचे अड. नाईक यांनी पुढे बोलतांना सांगितले. मतदारांनी राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉग्रेसला दिलेले मत भाजपच्याच पारड्यात पडणार असल्याचे सांगतानाच आम आदमी सारख्या पक्षाला मत दिल्यास ते मत शिवोलीच्या प्रगती आणि विकास कार्याच्या हितासाठी जाणार असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.
दरम्यान, प्रचाराची सुरुवात केल्यापासून याभागातील घरांघरांत पिण्याच्या पाण्याचा तीव्र समस्यां असल्याचे जाणवले , वीज पाणी तसेच रस्ते या प्राथमिक गरजांची सुविधा स्थांनिक जनतेला देऊ न शकणारे सरकार तसेच निष्क्रिय लोक- प्रतिनिधी शिवोलीला हवेतच कशाला असा संतप्त सवाल उपस्थित करून येत्या विधानसभा निवडणुकीत शिवोलीचे प्रतिनिधित्व आम आदमी पक्षाला एकदाच संधी देण्याची मागणी अड. विष्णू नाईक यांनी शेवटी केली.