डॉ मनीष एस कुशे यांनी त्यांचे पहिले सुपर स्पेशालिटी केअर क्लिनिक डायबिटीज, थायरॉईड आणि एंडोक्राइनोलॉजी क्लिनिकचा शुभारंभ

.

 

पणजी, ता. ५ डॉ मनीष एस कुशे यांच्या डायबिटीज, थायरॉईड आणि एंडोक्राइनोलॉजीवरील पहिल्या सुपर स्पेशालिटी केअर क्लिनिकचे उदघाटन आज झाले. विशेष म्हणजे कोणाही नामवंत वा राजकीय व्यक्तीस न बोलावता त्यांनी आपल्या क्लिनिकचे उदघाटन आपले वडील श्रीकृष्ण कुशे व आई शुभांगी कुशे यांच्या हस्ते केले. जिंजर हॅटेलसमोरील गेरा इम्पेरियम ग्रैंड येथील दुसऱ्या मजल्यावरील गाळा क्रमांक २१० या ठिकाणी हे क्लिनिक रुग्णसेवेसाठी खुले झाले आहे. डॉ मनीष एस कुशे एफआरसीपी (लंडन), एमआरसीपी (जीआयएम), एमआरसीपी (लंडन-मधुमेह आणि

एंडोक्राइनोलॉजी), सीसीटी (मधुमेह आणि एंडोक्राइनोलॉजी), एफसीपीएस (मुंबई), एमबीबीएस (मुंबई) असे उस विद्याविभूषित असून ते एमबीबीएसनंतर सायन, मुंबई येथील लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर निवासी म्हणून रुजू झाले. इंटर्नल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर फेलोशिप पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तेथे १० वाईन अधिक काळ एनएचएस मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सिनियर हाऊसमन ते एंडोक्राइनोलॉजीमधील विशेषज्ञ रजिस्ट्रार अशा विविध पदावर काम केले आहे. त्यानंतर त्यांनी वेस्ट यॉर्कशायर, युनायटेड किंगडम येथे मधुमेह/ एंडोक्रिनोलॉजीचे उच्च विशेष प्रशिक्षण घेतले. युनायटेड किंगडममधीन विविध रुग्णालयांमध्ये त्यांनी सल्लागार फिजिशियन आणि एंडोक्रिनोलॉजिस्ट म्हणून काम केले.

यूकेमधील प्रतिष्ठित बारविक विद्यापीठाकडून त्यांना मधुमेह आणि पोषण या विषयात पदव्युत्तर पुरस्कार मिळाला आहे. जात्याच हुशार असलेल्या मनीष कुशे यांनी २००८ मध्ये एफसीपीएस मेडिसिन थिअरी परीक्षेत प्रथम आल्याबद्दल त्यांना “जहांगीर भाभा स्कॉलरशिप मिळाली. तसेच त्यांनी एफसीपीएस मेडिसिन प्रैक्टिकल परीक्षांमध्ये प्रथम येत कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्सकडून शिष्यवृत्तीही मिळवली. गेल्या १५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित केले आहे.

यावेळी डॉ. मनीष एस कुशे यांनी सांगितले की, “गोव्यातील रुग्णांना मधुमेह आणि एंडोक्राइनोलॉजीमधील उच्च व वैयक्तिक आरोग्यसेवा देणे, हे आमचे ध्येय आहे. ” मधुमेहाविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, भारतात आजकाल २० ते ७० वयोगटातील सुमारे ८.७ लोकांना मधुमेह दिसून येत असल्याने ते एक मोठे आव्हान होत आहे. वेगाने होणारे शहरीकरण, बैठी जीवनशैली, जंक फूड्स असा अस्वास्थ्यकर आहार, तंबाखूचे विविध प्रकारे सेवन लपणा व वजन अतिप्रमाणात वाढल्याने मधुमेहाचा धोका वाढत आहे. निरोगी आहार व नियित व्यायाम यासारख्या जीवनशालीतील बदलाने मधुमेहाचा धोका टाळता येणे वा त्यास विलंब करणे शक्य आहे. संसगर्जन्य रोगांमुळेही मधुमेहाचा विकार बळावतो, असे दिसून आले आहे. वाढते आयुर्मान हे जरी चांगले असले तरीही मधुमेहाला ते पूरक ठरत आहे.

गेली दोन वर्षे आपण कोविडशी झगडतो आहे. कोविड आणि एंडोकिनोलॉजी यांचा तसा घनिष्ठ संबंध आहे. सार्म सीओन्ही-२ म्हणजेच कोरोनाव्हायरस, ज्यामुळे कोविड-19 होतो. एंजियोटेन्सिन कन्व्हटिंग एन्झाइम २ (एमसीई २) रिसेप्टरद्वारे पेशींमध्ये प्रवेश मिळवतो. मानवांमध्ये, एससीई२ रिसेप्टर्स स्वादुपिंड, थायरॉईड ग्रंथी, अंडाशय आणि वृषणासह अनेक अंतःस्रावी ग्रंथींमध्ये सवले जातात. अंतःस्रावी प्रणाली विशेषतः कोविड-१९ मुळे नाश पावतात व त्यामुळे त्यांचे कार्य मंदावते. थायरॉईडचे बिघडलेले कार्य आणि हायपरग्लाइसेमिया हे कोविड-१९ ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोंदवले गेले आहे.

मधुमेहाचे दोन प्रकार असून पहिल्या प्रकारचा मधुमेह (आधी इन्सुलिन-आश्रित किंवा बालपण-सुरू होणारा मधुमेह म्हणून ओळखला जाणारा) इन्सुलिन उत्पादनाच्या कमतरतेमुळे दर्शविला जातो.

दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहात (पूर्वी नॉन-इन्सुलिन-आश्रित किंवा प्रौढ-सुरुवात मधुमेह म्हणून ओळखला जाणारा) शरीराच्या इन्सुलिनच्या अप्रभावी वापरामुळे होतो. अवास्तवपणे वाढलेले वजन आणि शारीरिक हालचालीची किंवा व्यायामाची कमतरता यामुळे तो बळावतो. गर्भावस्थेतील मधुमेह हा हायपरग्लायसेमिया आहे जो गर्भधारणेदरम्यान प्रथम ओळखला जातो. यामुळे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

एंडोक्राइनोलॉजी म्हणजे काय?

एंडोक्राइनोलॉजी हा औषधाचा अभ्यास आहे जो एंडोक्राइन सिस्टमशी संबंधित आहे जी हार्मोन्स नियंत्रित करणारी प्रणाली आहे. संप्रेरक ग्रंथीद्वारे तयार केले जातात आणि रक्तप्रवाहात विविध ऊतकांना पाठवले जातात आणि त्यांना काय करावे हे सांगण्यासाठी.

एंडोक्रिनोलॉजिस्ट हे विशेष प्रशिक्षित डॉक्टर आहेत जे ग्रंथींशी संबंधित रोगांचे निदान करतात. हे डॉक्टर या परिस्थितीमध्ये तज्ञ असल्यामुळे, हार्मोनल समस्या हाताळताना एंडोक्रिनोलॉजिस्टचे निदान व उपचार तुमच्या विकारांवर मात करण्यासाठी योग्य कार्य करतात.

डॉ. कुशे यांच्या पणजीतील क्लिनिकमध्ये रुग्णसेवेस शुभारंभ झाला असून दक्षिण गोव्यातील रुग्णांसाठी बोर्डा-मडगाव येथील सेंट ज्योकिम चॅपल रोडवरील डायस रेसिडेन्सीमध्ये लवकरच क्लिनिक सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

एंडोक्राइनोलॉजी सोसायटी, एन्डोक्राईन सोसायटी, यूएसए, ब्रिटीश क्लिनिकल डायबेटालाजिस्ट, रॉयल.

कॉलेज आफ फिजिशियन्स, गोवा मेडिकल कैन्सिल, महाराष्ट्र मेडिकल कैन्सिल अशा विविध संस्थांचे सदस्य आहेत.

पणजी डॉ. मनीष कुशे यांच्या क्लिनिकचे फीत कापून उद्घाटन करताना श्रीकृष्ण कुशे आणि शुभांगी कुशे बाजूला डॉ मनीष आणि बिंदू कुशे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar