मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुंबईला रवाना : गोमंतकीयांच्यावतीने लतादीदींना वाहणार श्रद्धांजली

.

 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे आणि गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झाले आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दुपारी ३ वाजेपर्यंत लतादीदींचे पार्थिव
प्रभूकुंज या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
समस्त गोमंतकीय जनतेच्यावतीने लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवाना झाले आहेत. शिवाजी पार्कवर आयोजित अंतिम संस्कारावेळी ते उपस्थित राहणार आहेत.

,

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar