आम आदमी पक्ष जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व वचनांची पूर्तता करण्यास कटिबद्ध आहे. आम आदमी पक्षाने सर्व गोमंतकीयकांना दिलेल्या तेरा वचनांची सत्तेवर आल्यावर पूर्तता तर करेलच शिवाय शिवोली मतदार संघाकरिता आपण जी वचने देत आहे ती पूर्ण करण्याकरिता आपण निवडून आल्यावर प्राधान्य देणार आहे असा विश्वास आप चे शिवोली मतदार संघातील उमेदवार ऍड. विष्णू नाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शिवोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विष्णू नाईक यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, यावेळी त्यांच्यासोबत जेष्ठ कार्यकर्ते अवीन फोन्सेका उपस्थित होते. शिवोली मतदार संघातील ग्रामपंचायतीमध्ये मोफत वायफाय झोन, बहुउद्देशीय सभागृह, भटक्या गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी गोशाळा, शेतीला प्रोत्साहन, जुन्या जलवाहिन्या बदलणे, प्रत्येक पंचायत क्षेत्रात वाचनालय, बालोद्यान, जोगर्स पार्क, सुसज्ज क्रीडा संकुल, जेष्ठासाठी मनोरंजन पार्क, आरोग्य सेवा उंचावणे, रस्त्यांची दुरुस्ती आदी शिवोली मतदार संघासाठी जाहीरनाम्यात आपण वचने दिलेली आहेत असे विष्णू नाईक यांनी सांगितले.
गेल्या विस वर्षातील भाजपा आमदाराने व गेल्या पाच वर्षात गोवा फॉरवर्ड पक्षाच्या आमदाराने मतदार संघाला विकासापासून वंचीत ठेवले, मतदार संघाचा सुयोग्य विकास करण्यासाठी यावेळी मतदारांनी झाडू निशाणीवर शिक्का मारून आम आदमी पक्षाला सरकार करण्याची एक संधी द्यावी असे आवाहन विष्णू नाईक यांनी यावेळी केली.
भाजपा व गोवा फॉरवर्ड पक्षाचा जाहीरनामा दरवेळी एकसारखा असतो कारण जाहीरनाम्याप्रमाणे त्यांची वचनपूर्ती कधीच करीत नाहीत त्यामुळे मतदार संघ अविकसित राहिलेला असल्याचा आरोप अवीन फोन्सेका यांनी यावेळी बोलताना केला.