हरीश कामत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन ” करवील ” या रोपट्यांला पाणी घालून करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांजली गावस तर अध्यक्षस्थानी नुतन साखरदांडे व संस्थेचे अध्यक्ष हरीश कामत व खास वक्ता म्हणून गौरी गदें उपस्थित होत्या.
प्रमुख वक्ता गौरी गदें यांनी मकरसंक्रांती सणाचा शास्रीय हेतू व उदेश्य सांगताना या सणाद्धारे एक प्रकारचा गोडवा हा स्तायी भाव निर्माण होतो असे सांगितले. या सणाद्धारे आपण नारीला सन्मान प्राप्त करून देतो असे त्यांनी पुढे सांगितले. नुतन साखरदांडे यांनी आज या सणाचे स्वरूप बदलले आहे असे सांगताना पुस्तक म्हणून वाण दिले जाते या उपक्रमाचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे प्राजंली गावस यांनी महिलांच्या व्यक्तीमत्वाचा विकास झाला पाहिजे असे सांगितले व निसर्गाकडे जाणाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी वाण म्हणून उपस्थितांना पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. सुरूवातीला हरीश कामत यांनी परीचय करून दिला. आशीया वाळवे हीने सुत्रसंचालन केले तर वामन धारवाडकर यांनी आभार मानले फोटो भारत बेतकेकर उपस्थित महिला
नुतन साखरदांडे प्रांजली गावस गौरी गदें, हरीश कामत .