विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असून उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. म्हापसात तृणमूल कॉंग्रेस – मगो युतीचे उमेदवार अॅड.तारक आरोलकर यांना उदंड प्रतिसाद मिळत असून दिवसंदिवस मजबूत उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येत आहे.इतर पक्षांच्या उमेदवारांच्या तुलनेत अॅड.आरोलकर हे उच्च शिक्षित, अनुभवी, कार्यक्षम आणि लोकप्रिय नेते आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांचा पाठिंबा वाढत आहे.
अॅड.तारक आरोलकर यांनी आज त्यांच्या प्रचार मोहिमेचा एक भाग म्हणून, म्हापसा बाजारपेठेत भेट दिली.तसेच,केंद्रीय अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करताना गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार न केल्याबद्दल भाजपवर टीका करणार्या विक्रेते आणि दुकानदारांचे गार्हाणे ऐकून घेतले. अॅड.आरोलकर यांनी त्यांना आश्वासन दिले की, सत्तेवर आल्यानंतर लगेच, तृणमूल – मगो युती सरकार त्यांच्या पार्किंगच्या जागा, पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या आणि बाजार क्षेत्राला त्रासदायक असलेल्या कचरा विल्हेवाटीच्या इतर गंभीर समस्या सोडवण्याच्या दिशेने काम करणार आहे.
दरम्यान मगोचे सर्वेसर्वा तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल म्हापसात अॅड.तारक आरोलकर यांच्यासाठी प्रचार केल्याने तृणमूल कॉंग्रेस आणि मगोच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. म्हापसातील मगोचे सरचिटणीस तुषार टोपले यांनी अॅड.तारक आरोलकर यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचे बळ आणखी वाढले आहे. टोपले हे माजी नगरसेवक असून बार्देश पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.सध्या विठ्ठल मंदिर आणि चामुंडेश्वर मंदिराशी ते संबंधित आहेत.यापूर्वी ते भाजपमध्ये होते आणि त्यांनी मंडळ उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणून काम केले.मगोचे युवा सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. त्यांचे काका रघुनाथ टोपले, म्हापसाचे पहिले आमदार होते. म्हापसात मोठ्या संख्येत वैश्य समाज असल्याने टोपले हे त्या समाजातील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या याचा फायदा
अॅड.आरोलकर यांना फायदा होण्याची शक्यता आहे..