भाजपने देश आणि राज्यांना दिवाळखोरीत ढकलले: सिद्धरामय्या

.

 

पणजी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी आरोप केला की, भाजपने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे आणि वाईट अर्थव्यवस्थेच्या धोरणाने देश दिवाळखोरीत ढकलला आहे.

सिद्धरामय्या यांनी मंगळवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की केंद्रात आणि गोवा राज्यात भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी ठरला आहे.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, एआयसीसीच्या प्रवक्त्या अलका लांबा, आर व्ही देशपांडे, एम बी पाटील, प्रियांक खडगे, प्रकाश राठोड, जमीर अहमद, अमरनाथ पणजीकर, आयवन डिसूझा आदी उपस्थित होते.

‘भाजपच्या राजवटीत विकास ठप्प झाला आहे. भाजपचा अयशस्वी कारभार आणि कुशासनामुळे तिजोरी रिकामी झाली आहे. असे ते म्हणाले.

सिद्धरामय्या म्हणाले की, भाजपच्या केंद्रातील गेल्या आठ वर्षांच्या राजवटीने ८७ लाख कोटी कर्ज घेतल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. आता या आर्थिक वर्षात मोदी सरकार ११ लाख कोटींहून अधिक कर्ज घेत आहे. त्यांची आर्थिक धोरणे अयशस्वी ठरली आहेत आणि त्यामुळे देश अशा टप्प्यावर पोहोचला आहे.

“गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनतेने आम्हाला जनादेश दिला होता, पण भाजपने पक्षांतराला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले.’’ असे ते म्हणाला.

ते म्हणाले की, काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर तो समाजात बदल घडवून आणतो. “आम्ही लोकशाहीसाठी वचनबद्ध आहोत, धर्मनिरपेक्षतेसाठी वचनबद्ध आहोत, समानता आणि सामाजिक न्यायासाठी वचनबद्ध आहोत.’’ असे ते म्हणाले.

‘‘पण भाजपने समाजात फूट पाडली आहे. त्यांच्याकडे समाजासाठी कोणतीही विचारधारा आणि कोणताही कार्यक्रम नाही.’’ असे सिद्धरामय्या म्हणाले.

ते म्हणाले की कोविडच्या काळात मोदी सरकार आणि सावंत सरकार अपयशी ठरले, ज्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला.

गेल्या १० वर्षात गोव्यातील जनतेसाठी काहीही न केल्याने भाजप सरकारने माफी मागावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. “ते आपला मागचा जाहीरनामा अंमलात आणण्यात अपयशी ठरले आहे. आता पुन्हा ते त्याच गोष्टींचे वचन देतील.” असे ते म्हणाले आणि ६० वर्षांच्या मुक्ती सोहळ्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले ३०० कोटी आणण्यात सावंत सरकार अपयशी ठरले आहे असे सांगितले.

ते म्हणाले की, खाणबंदीमुळे ३ लाखांहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, परंतु भाजप सरकारने खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी काहीही केले नाही. “आज सावंत सरकारची देणी 20 हजार कोटींहून अधिक आहेत.” असे ते म्हणाले.

काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर खाणकाम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन त्यानी दिले.

ते म्हणाले की, टीएमसी आणि आप गोव्यात केवळ मतांचे विभाजन करण्यासाठी आहेत. ‘जनतेचा जनादेश काँग्रेसला आहे. आम्ही बहुमताने सरकार स्थापन करू.” असे चव्हाण म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें