सतीश शेटगांवकर देणार मांद्रेला नवी दिशा

.

या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून एकुण ०९ उमेदवार आपला बळ दाखवीत आहेत. काही नवीन व्यक्ती आहेत तर काही जुन्या. तसे पाहिले तर यावेळी अपक्ष उमेदवारांना जास्त संधी आहे असे दिसून येते. कारण भाजप, कोंग्रेस, मगो, गोवा फाॅरवड आणि ईतर पार्टींवर लोकांचा तीव्र संताप दिसून येतो. यावेळी तर मांद्रे मतदारसंघात मजेशीर खेळ होणार आहे. माजी मुख्यमंत्री, आत्ताचे आमदार, आत्ताचे जिल्हा परिषद हे सर्व रणांगणात उतरले आहेत. त्यातलाच एक व्यक्ती म्हणजे सतीश शेटगांवकर. आपल्या जीवनातील मुख्य ३ पायऱ्या पंच, सरपंच आणि आता जिल्हा परिषद सदस्य त्यानी पार केलेल्या आहेत. आता पुढची पायरी म्हणजे विधानसभा निवडणुक. सतीशची खासीयत म्हणजे ते जे सांगतात ते करून दाखवतातच. ते ज्या पदावर पोचले तीकडे विकास कामे त्यांनी मार्गे लावली. आत्ता सुध्दा जिल्हा परिषद सदस्य असताना त्यानी ६ विकास कामांना सुरूवात केलेली आहे. सत्तेत असून जी कामे आमदार करू शकले नाही ती विरोधात असून सतीश शेटगांवकर करताहेत. त्यांची होणारी कामे अडकवून ठेवण्याचा आमदारांने पुर्ण प्रयत्न केला होता, परंतु सतीश शेटगांवकर आपली कामे मार्गी लावण्यात माहीर आहेत. त्यांची मांद्रे मतदारसंघासाठी काही तरी नवीन करण्याची तळमळ आणि दूरवर पाहण्याची दृष्टी त्यांना इतर उमेदवारांत वेगळ बनवते. मांद्रेतील लोकांना आमदार रूपी हवा असलेला उमेदवार सतीश शेटगांवकरांच्या स्वरूपात यावेळी मिळालेला आहे. मांद्रे मतदारसंघाने पुष्कळ आमदार दीले परंतु ते लोकांच्या मतावर काही खरे उतरू शकले नाही. मुख्य आणि गरजू सुविधा मांद्रेतील लोकांना आजपर्यंत उपलब्ध झाल्याच नाही. आत्ताचेच पहा, गेले सहा सात दिवस पाण्याची टंचाई लोकांना भासते. सरकारने लोकांची पाण्याची बीलं तर तात्पुरती माफ केली परंतु लोकांना २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राहूनच गेले. लोकांचं असं म्हणणं आहे की पाण्याची बीलं माफ करू नका, आम्हाला २४ तास पाणीच द्या. वर्तमान आमदारांना २०१७ निवडणुकीत मांद्रेतील लोकांनी भरगच्च मतांनी कॉंग्रेसच्या टिकीटेवर निवडून आणलं होतं. त्यावेळेचे त्यांचे ते शब्द अजुन आठवतात. की मी ”जायंट कीलर” आहे. कारण म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सत्तेवरून खाली उतरविले होते. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की त्यावेळी आपण ”जायंट कीलर” नव्हतात, लोक ”जायंट कीलर” होते. २०१९ ची पोटनिवडणूक केवळ आपल्यामुळेच घडून आली. मांद्रेतील लोकांना भ्रमात पाडून केवळ आपला स्वार्थ साधण्याकरीता भाजपमध्ये गेलेल्या आणि ४ वर्षे झोप काढुन राहिलेल्या अशा आमदारांना लोक कसे बरे आपले मत मारणार. आज जी लोकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता होत आहे ती केवळ याच आमदारांमुळे. सांगायचे म्हणजे जी व्यक्ती मुळ सुविधा देवू शकला नाही ती व्यक्ती विकास कामे आणि सरकारी नोकरी काय देणार. ५ वर्षात खूप काही होवू शकते फक्त जिद्द आणि दुरवर पाहण्याचा दृष्टीकोन पाहीजे.

ज्या व्यक्तीला मांद्रे मतदारसंघातून आमदार, मुख्यमंत्री केले त्यांच्या हातून पुरेसपुर कामे न झाल्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत लोकांनी त्यांना अस्वीकार केले. गेली पाच वर्षे काहीच हालचाल न करता राजकारणात जशी सेवानिवृत्ती घ्यावी तशी घेवून परत रणांगणात यायचा काही लोकांनी धाडस केलेला आहे. मी फक्त तुमचाच आमदार नसून पुर्ण गोव्याचा मुख्यमंत्री आहे. उच्च शिक्षण घेवून सुद्धा गुरेढोरे घ्या, नाहीतर भाजीपाला घाला अशी मनाला टोचून लागणारी वाक्ये ज्याने एैकवीली अशा माणसाला परत एक संधी का म्हणुन मिळावी. मला पुर्ण गोवा पहावा लागतो, असे अपशब्द आपल्याच मतदारसंघातील लोकांना सांगणाऱ्या व्यक्तीला लोक आपल्या हृदयात जागा देतील का?
यावेळी मांद्रे मतदारसंघ काही उमेदवार फक्त आपल्या पैशांच्या जोरावर जिंकू पाहतात. त्यांना गरज आहे भुतकाळात जाण्याची. असेच काही उमेदवारांनी काही वर्षापूर्वी भरपूर पैसा खर्च करून आणि भरपूर धनधान्य वाटून जिंकून येण्याची स्वप्ने पाहिली होती.परंतु वास्तव्यात तसं काही घडलंच नाही. सर्व माणसे पैसे घेऊन मतं मारणार हे त्यानी विसरूनच जावे. आधी काहीतरी कामे करून लोकांची मनं जिंका आणि नंतर निवडून येण्याची स्वप्ने पाहा.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar