भारतविरोधी भूमिका घेणार्‍या ह्यूंदाई (Hyundai) आस्थापनाने भारतियांची बिनशर्त माफी मागावी, अन्यथा भारतीय नागरिक आस्थापनाच्या उत्पादनांवर बहिष्कार घालतील

.

 

हिंदू जनजागृती समितीची मागणी

भारतविरोधी भूमिका घेणार्‍या ह्यूंदाई (Hyundai) आस्थापनाने भारतियांची बिनशर्त माफी मागावी, अन्यथा भारतीय नागरिक आस्थापनाच्या उत्पादनांवर बहिष्कार घालतील

भारतविरोधी भूमिका घेणार्‍या ह्यूंदाई (Hyundai) आस्थापनाने भारतियांची बिनशर्त माफी मागावी, अन्यथा भारतीय नागरिक आस्थापनाच्या उत्पादनांवर बहिष्कार घालतील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिली आहे. हिंदु जनजागृती समितीने ह्यूंदाई आस्थापनाच्या पणजी येथील कार्यालयात या आशयाचे एक निवेदन दिले आहे. या वेळी ह्यूंदई आस्थापनाच्या पणजी येथील कार्यालयाचे व्यवस्थापक म्हणाले की, समितीने दिलेले निवेदन कंपनीच्या मुख्य कार्यालयात पाठवले जाईल.

हिंदु जनजागृती समितीने या निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच पाकिस्तानमधील ह्यूंदाई (Hyundai) आस्थापनाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ५ फेब्रुवारी ‘‘आपल्या काश्मिरी बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करूया आणि काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी त्यांच्या समर्थनात उभे राहूया !’’, असे आक्षेपार्ह ट्वीट केले. ह्यूंदाईच्या या भूमिकेचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. भारताचा अविभाज्य भाग असलेला काश्मीर बळकावण्यासाठी पाकिस्तान तेथे आतंकवादी कारवाया करून भारतीय सैन्यांवर प्रतिदिन आक्रमणे करत आहे. काश्मीरच्या रक्षणार्थ हजारो भारतीय सैन्य कर्मचारी आणि अधिकारी हुतात्मा झाले. काश्मिरवर आतंकवादामुळे साडेचार लाख काश्मिरी हिंदूंना विस्थापित व्हावे लागले. तेथील हिंदूंच्या शेकडो मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. हजारो हिंदू स्त्रियांवर बलात्कार आणि हजारो हिंदूंची कत्तल करण्यात आली आहे. याचे ‘ह्यूंदाई आस्थापन’ समर्थन करणार आहे का ? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. विश्‍वभरात एक आतंकवादी देश म्हणून कुप्रसिद्ध पावलेल्या पाकिस्तानच्या बाजूने उभे रहाणार्‍या ‘ह्यूंदाई आस्थापना’ला भारतातच काय विश्‍वभरात व्यवसाय करण्याचा नैतिक अधिकार आहे का ? ‘ह्यूंदाई आस्थापना’ला भारतात व्यवसाय करायचा असेल, तर ‘ह्यूंदाई आस्थापना’च्या प्रमुखाने समोर येऊन समस्त भारतियांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे. ‘ह्यूंदाई आस्थापनाने’ भारतियांकडून विरोध झाल्यानंतर आस्थापनाच्या पाकिस्तानातील वितरकावर ठपका ठेवून जी काही भूमिका मांडली, ती क्षमायाचना नसून ते केवळ वरवरचे स्पष्टीकरण आहे. आस्थापनाने भारतियांची राष्ट्रीय अस्मिता दुखावली आहे. त्यामुळे सदर आस्थापनाने आक्षेपार्ह ट्विट मागे घेतले पाहिजे. पाकिस्तानातील वितरकावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, तसेच यापुढे अशी चूक होणार नाही, असे वचन भारतियांना दिले पाहिजे. अन्यथा समस्त भारतीय ‘ह्यूंदाई आस्थापना’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालतील, अशी चेतावणी आम्ही देत आहोत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar