अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे ही काळाची गरज : विनोद पालयेकर

.

आपण निवडणूक अपक्ष म्हणून लढवणे ही काळाची गरज होती, आपण केलेल्या विकासकामामुळे आपल्याला या निवडणुकीत कोणीही प्रतिस्पर्धी नाही , घरोघरी प्रचार करताना आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवोली मतदारसंघात आपण जास्तीत जास्त विकासकामे केली. या केलेल्या विकासकामांच्या उदघाट्नला तसेच शुभारंभ करताना मतदार संघातील सहाही पंचायतीचे सरपंच, पंचसदस्य त्यात्या पंचायत क्षेत्रात हजर होते, त्यांची छायाचित्रे आपल्या विकासकामाच्या पुस्तिकेत आहेत.विशेष म्हणजे हणजूण कायसूव पंचायतीचा सरपंच जो या निवडणुकीला उभा आहे, तोही या पंचायत क्षेत्रातील विकासकामांच्या पायाभरणीला व उदघाट्नला हजर होता, आता हे विकासकामांचे साक्षीदार आता कोणत्या तोंडाने आपण विकासकामे काहीच केली नाहीत असा अपप्रचार करीत आहेत असा प्रश्न शिवोली मतदार संघातील अपक्ष उमेदवार विनोद पालयेकर यांनी वागातोर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

सुरवातीच्या अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला चांगले सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळेच आपण अनेक कोटीची विकासकामे मतदार संघात करू शकलो. शिवोली मतदारसंघातील पाण्याची कायमची सोडवण्यासाठी आणलेली तिलारीची जलवाहिनी त्यातील एक होय. आपल्या विकासकामाच्या पुस्तिकेत फक्त पुर्ण केलेल्या कामाचेच फोटो व माहिती दिली आहे, जे प्रकल्प अपूर्णांवस्थेत आहेत त्यांची नोंद नाही, जसे की भूमिगत विजवाहिनी. हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रात सद्या भूमिगत विजवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.
करोना महामारीमुळे नंतर च्या काळात सर्व विकासकामांना खीळ बसला. या काळात करोनाचा आघात आपल्या कुटूंबावर बसला, आपले दोन भाऊ दुरावले, त्याचा परिणाम मतदारांशी संपर्क ठेवण्यावर झाला. पण या पुढे आपण मतदार सघात राहिलेली सर्व विकासकामे पूर्ण करणार असून मतदार संघ अंमली पदार्थ मुक्त करण्याचा संकल्प केला आहे असे विनोद पालयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar