डबल इंजिनची डिलिव्हरी शून्य : सचिन पायलट

.

 

पणजी: काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बुधवारी आरोप केला की गोव्यात भाजपची डबल इंजिन डिलिव्हरी शून्य आहे. “काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आणि जाहिरनाम्यात जी वचने दिली आहे ती सत्यात आणणार.” असे ते म्हणाले.

सचिन पायलट यांनी पणजीत पत्रकार परिषद घेवून काँग्रेस पक्षाला चांगला पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, अमरनाथ पणजीकर, सुनील कवठणकर, नौशाद चौधरी, स्वाती केरकर उपस्थित होते.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या माजी नेत्या स्वाती केरकर यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.

अनेक राजकीय पक्ष ही विधानसभा निवडणूक लढवत आहेत. मात्र, काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा हेतू फळाला येणार नाही. गोव्यात आम्ही स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहोत. आमचे सरकार पारदर्शक असेल आणि दिलेली वचने आम्ही पूर्ण करू, असे सचिन पायलट म्हणाले.

“काँग्रेस पक्ष सर्व प्रश्नांवर आणि राज्याच्या भवितव्यासाठी गोव्यातील जनतेच्या पाठीशी उभा आहे. तरुणांत संधी हव्या आहेत आणि वाढी बरोबर त्यांना शाश्वत विकास हवा आहे.” असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळेल. “गोव्यातही बहुमत मिळेल कारण नवीन चेहरे निवडणूक लढवत आहेत आणि लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत.” असे ते म्हणाले.

“भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि इंधनाचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते अर्थव्यवस्था हाताळण्यात अयशस्वी ठरले आणि कोविडच्या काळातही ते अयशस्वी झाले.” असे पायलट म्हणाले.

खाणकाम पुन्हा सुरू करण्यात भाजप अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. “खाणकाम स्थगित केल्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.” असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, भांडवलदार मित्रांना मदत करण्यासाठी तीन रेषीय प्रकल्प राबविण्याचा भाजपचा मानस आहे.

“गोव्यातील लोकांना डबल इंजिनचा फायदा झाला नाही. ते निर्णायक कृती करू शकलेले नाहीत. त्यांची डिलिवरी शून्य आहे.’’ असे ते म्हणाले.

स्वाती केरकर म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांना स्वातंत्र्य नव्हते, म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षात परत आल्या. “मला आयपॅकच्या आदेशांवर काम करावे लागत होते. जे मला मान्य नव्हते.’’ असे ती म्हणाली.

केरकर यांचे उदाहरण देत अमरनाथ पणजीकर यांनी गोव्याच्या भल्यासाठी काँग्रेसच्या माजी समर्थकांना पुन्हा पक्षात येण्याचे आवाहन केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar