मगो पक्ष आणि तृणमूलने युती करून गोव्यात जोरदार मोहीम सुरू केली होती, तृणमूलने युवकांना वीस लाखापर्यंत चार टक्के व्याजाने कर्ज देऊ, आदी लोकांना आकर्षित करणाऱ्या योजना जाहीर केल्या मात्र या योजनातील फोलपणा लोकांना कळून चुकला आहे. १५ वर्षे पश्चिम बंगालमध्ये सरकार असताना तेथे अशा योजना सुरू न करता तृणमूल गोवात त्या कशा सुरू करणार? हा मुद्दा लोकांना पटत असावा, विरोधी पक्षाने हाच मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे तृणमूल पक्ष बॅक फुटवर पडला आहे. यापूर्वी तृणमूलची जी हवा होती, ती हवा गोव्यातील फुगवलेला फुग्यातुन हळूहळू कमी होताना दिसत आहे.
अनेकांनी तृणमूल पक्षात प्रवेश केला होता पण नंतर त्यांना शहाणपणा सुचला व परत ते आपल्या पुवी॑च्या पक्षात वापस आले. मगो पक्षातील काही निष्ठा कार्यकते दुरावले व त्यानी तृणमूल पासून फारकत घेतली. तृणमूलने जरी कितीही जोर लावला तरी त्यांना गोवात भवितव्य नाही ही काळया दगडावरची रेख आहे. तृणमूलने पश्चिम बंगाल मध्ये जो काही निवडणुकीत हिंसाचार केला तो सर्वक्षुत आहे. लोक त्या पक्षापासून दूरच राहतात.
मगो पक्ष आणि तृणमूलने युती करून गोव्यात जोरदार मोहीम सुरू केली
.
[ays_slider id=1]