मला लक्ष्य करण्यासाठी भाजपने लाखो लोकांना त्यांच्या उपजीविकेपासून वंचित केले- दिगंबर कामत.

.

मला लक्ष्य करण्यासाठी भाजपने लाखो लोकांना त्यांच्या उपजीविकेपासून वंचित केले- दिगंबर कामत.

पणजी: मला वैयक्तिकरित्या लक्ष्य करण्याच्या हेतूने भाजपने गोवा विधानसभेची फसवणूक केली आणि लाखो गोमंतकीयांना त्यांच्या उपजीविकेपासून वंचित ठेवले हे सर्वात दुर्दैवी आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे आणि मी नेहमी म्हणतो की सत्याचा नेहमीच विजय होतो. माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांवरून खाणकामावरील तथाकथित लोकलेखा समितीचा अहवाल आणि तथाकथित रु. 35,000/- कोटींचा खाण घोटाळा कधीच अस्तित्वात नव्हता हे स्पष्ट होते. कपटी भाजपचे पाप आता जनता माफ करणार नाही असे भावनीक उद्गार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काढले.

दिगंबर कामत यांनी गुरुवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेवून तथाकथीत खाण व्यवसायातील कथीत ३५ हजार कोटी घोटाळ्यासंबधी पुराव्यासकट भाजपचा पर्दाफाश केला. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, महाराष्ट्राचे मंत्री बाळासाहेब थोरात, ॲड. कार्लोस आल्वारीस फरैरा, काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, प्रचार संयोजक विशाल पै काकोडे उपस्थित होते.

गोवा विधिमंडळ विभाग, खाण आणि भूविज्ञान संचालनालय, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनीक तक्रार विभाग यांच्याकडुन मिळवीलेली कागदपत्रे दिगंबर कामत यांनी पत्रकारां समोर मांडली. या कागदपत्रांतून ३५ हजार कोटींचा खाण घोटाळा कधी झालाच नव्हता हे स्पष्ट होते असे ते म्हणाले.

‘‘गोमंतकीयांसमोर ही माहिती उघड करताना मला वेदना होत आहेत. मला लक्ष्य करण्याच्या भाजपच्या राजकीय सूडबुद्धीचा परिणाम गोव्यातील खाणकाम पूर्णपणे ठप्प होण्यात झाला. त्यामुळे लाखो कुटुंबांना मोठ्या आर्थिक ओझ्याखाली ढकलले गेले आणि राज्य दिवाळखोर झाले असे कामत यांनी सांगितले.

‘‘राज्यातील प्रत्येक व्यक्ती आज आर्थिक आणीबाणीत जगत आहे.’ असे ते म्हणाले.

खाण आणि भूविज्ञान संचालनालयाचे पत्र क्र. ०१५५/२००४/एडएम- माइन्स/७६५, दिनांक १३/०६/२०१६ हे स्पष्ट करते की लीजहोल्ड क्षेत्राबाहेरील कामकाज प्रथमदर्शनी ५७८.४२ हेक्टरच्या तुलनेत केवळ ९.२८५९ हेक्टर असल्याचे दिसून येते. याच्या आधारे शहा आयोगाच्या अहवालात अंदाजे रु. 35,000 कोटींची आवक झाली. भाजपने आपल्या स्वार्थी राजकीय फायद्यासाठी खाण घोटाळा झाल्याचे सांगुन लोकांची फसवणूक केली आणि गोव्यातील लोकांच्या भावना, आणि जीवनाशी खेळले हे सिद्ध करण्यासाठी हे पत्र पुरेसे आहे असे कामत म्हणाले.

माझ्याकडे अवर सचिव गोवा विधीमंडळ विभागाकडून मिळालेले पत्र क्र. LA/Com./PUC/2020/1204, दिनांक 3 नोव्हेंबर 2020, आहे जे स्पष्टपणे नमूद करते की खाणकामावरील लोकलेखा समितीचा अहवाल विधानसभेत सादर केला गेलाच नाही. या पत्रातून पुढे उघड झाले आहे की भाजपने विविध तपास यंत्रणांसमोर तसेच न्यायालयां समोर खोटी माहिती दाखल केली होती असा गंभीर आरोप दिगंबर कामत यांनी केला.

विधीमंडळ सचिवांकडुन प्राप्त झालेल्या 2 ऑगस्ट 2021 च्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणताही अहवाल जो स्वीकारला नाही तो अहवालच नाही, आणि कोणत्याही विभाग/व्यक्ती/एजन्सीला देऊ/फॉरवर्ड करता येणार नाही.

10 मार्च 2022 रोजी आम्ही सरकार स्थापन करत आहोत. खाणकामावरील या फसव्या लोकलेखा समितीच्या अहवालाच्या स्त्रोताची आम्ही चौकशी करू आणि या कृत्याला जबाबदार असलेल्या सर्वांना शिक्षा भोगावीच लागेल असे दिगंबर कामत यांनी सांगितले.

ॲड. कार्लोस आल्वारीस फैरेरा यांनी यावेळी बोलताना दिगंबर कामतांवर अकारण आरोप करणाऱ्या भाजपवर टीका केली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar