रोजगार निर्मिती, खाणकाम पुन्हा सुरू करणे आणि गोव्याला आयटी आणि नॉलेज हब बनवणे यावर काँग्रेसचा भर आहे: राहुल गांधी

.

 

बहुमताचे सरकार स्थापन करण्याचा कॉंग्रेसला जनादेश मिळणार – राहुल गांधी

मडगाव: गोव्याला आयटी आणि नॉलेज हब बनवण्यासाठी, पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी, खाणकाम पुन्हा सुरू करण्याबरोबरच बेरोजगारीच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी काँग्रेस पक्षाने भर दिलेला आहे असे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी मडगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, काँग्रेसची शक्ती रोजगार निर्मिती आणि गोव्याच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उत्प्रेरक ठरेल.

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, ज्येष्ठ नेते पी चिदंबरम, कॉंग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल, गोवा प्रभारी दिनेश राव , एआयसीसीच्या प्रवक्त्या अलका लांबा, खासदार फ्रांसिस सार्दिन, अमरनाथ पणजीकर, सुनिल कवठणकर उपस्थित होते.

“गोव्यातील पर्यटन क्षेत्राची स्थिती वाईट आहे. आपण त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि या क्षेत्राला अर्थव्यवस्थेसाठी नवसंजीवनी देण्याची आणि त्यातून नोकऱ्याही निर्माण करण्याची गरज आहे.’’ असे ते म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना गांधी म्हणाले की त्यांनी खाणकाम पुन्हा सुरू करण्याबाबत अभ्यास केला आहे आणि काँग्रेसचे सरकार आल्यावर ते पुन्हा सुरू केले जाईल. “आम्ही खनिज व्यवसाय कायदेशीर मार्गाने पुन्हा सुरू करू.” असे ते म्हणाले.

बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप सरकार हा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. “म्हणून आम्ही हा प्रश्न प्राधान्याने घेऊन तो सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही रोजगार निर्मितीसाठी 500 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. याशिवाय, गोव्याला आयटी आणि नॉलेज हब बनवण्यासाठी आमचा प्रस्ताव आहे.” असे ते म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी जवाहरलाल नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी विलंब केल्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास, कोळसा केंद्र, थ्री लिनियर प्रकल्प आणि इतर मुद्द्यांपासून ते लोकांना दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत.’’ असे गांधी म्हणाले.

“वर्षाला 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्याच्या आणि काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याच्या त्यांच्या आश्वासनाबद्दल ते (का बोलत नाहीत?” असा प्रशन् त्यांनी केला.

काँग्रेसने गोव्यातील लोकांच्या भावनांचा आदर केला आहे, त्यामुळे पक्षांतर करणाऱ्यांना तिकीट दिले नाही, असे ते म्हणाले. या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नवे चेहरे दिले आहेत. बहुमत मिळवून लगेच सरकार स्थापन करण्याचा आम्हाला विश्वास आहे.” असे ते म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar