काँग्रेस सरकार खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करेल: राहुल गांधी

.

 

कुडचडे: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी विधान केले की पक्षाचे सरकार बनताच कायदेशीर मार्गाने खनिज व्यवसाय पुन्हा सुरू केला जाईल आणि गोव्याच्या लोकांच्या हिताचे नसलेले प्रकल्प रद्द केले जाणार.

राहुल गांधी यांनी कुडचडे येथे सभेत बोलताना रोजगाराचाही प्रश्न या माध्यमातून सोडवला जाणार असे सांगितले. यावेळी कुडचडेचे उमेदवार अमित पाटकर उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, ज्येष्ठ नेते आणि निवडणूक रणनीतीकार पी चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, एआयसीसीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, एआयसीसीच्या प्रवक्त्या अलका लांबा, खासदार फ्रांसिस सार्दिन, एम के शेख, महिला अध्यक्ष बीना नाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड वरद मार्डोळकर, विश्वजित कदम, डॉमनिक फर्नांडिस आदी यावेळी उपस्थित होते.

“नवीन सरकार हे सर्व लोकांचे, तरुणांचे, शेतकरी आणि कामगारांचे असले पाहिजे. आम्ही लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ.’’ असे राहुल गांधी म्हणाले.

देशात रोजगार निर्माण करण्यात भाजप अपयशी ठरल्याचे राहुल गांधी म्हणाले. “प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे. यासाठी आम्ही खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे ते म्हणाले.

“आम्ही कोल हब रद्द करू कारण त्याचा लोकांना फायदा होत नाही.” असे ते म्हणाले.

“आम्ही गोव्यातील गरीब कुटुंबांना 6000 रुपये आर्थिक मदत देऊ. तसेच सरकारी सेवेत महिलांना 30 टक्के आरक्षणही देऊ. आम्ही रोजगार निर्माण करू आणि पर्यटन क्षेत्रालाही संजीवनी देऊ.” असे ते म्हणाले.

“भाजपने देशाची ‘अमीर हिंदुस्थान’ आणि ‘गरीब हिंदुस्थान’मध्ये विभागणी केली आहे. सर्वात श्रीमंत व्यक्ती संपत्ती मिळवत आहेत आणि आपले गरीब लोक बेरोजगारी, रुग्णालयातील सेवा, शिक्षण आणि ऑक्सिजनपासून वंचित आहेत. आम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे.” असे राहुल गांधी म्हणाले.

महागाई नियंत्रणात येईल आणि पेट्रोलचे दर रु. ८० प्रति लिटर होतील असे ते म्हणाले.

मतांच्या विभाजनाला वाव देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

दिगंबर कामत म्हणाले की, लोकांनी भाजपला घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. “ऑक्सिजन पुरवठा न करून रुग्णांची हत्त्या केल्या बद्दल भाजपला धडा शिकवा.’’ असे कामत म्हणाले.

अमित पाटकर यांना मतदान करून विजयी करा, असे आवाहन सार्दिन यांनी केले. “भाजपने पर्यावरणाचा ऱ्हास करून गोव्याचा नाश केला आहे. त्यामुळे गोव्याचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याची गरज आहे.’’ असे ते म्हणाले.

अलका लांबा म्हणाल्या की, महागाई दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी २ कोटी नोकऱ्या देण्यात अपयशी ठरले आहेत.’’ असे त्या म्हणाल्या.

“गेल्या वेळी आम्हाला बहुमत मिळू शकले नव्हते, पण यावेळी लोकांना बदल हवा असल्याने आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल अशी आशा आहे.” असे त्या म्हणाल्या.

मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपने आप आणि टीएमसीला आणले आहे, असा आरोप तिने केला.

लांबा म्हणाल्या की, गोव्यातील लोकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी पक्षांतर करणाऱ्यांना तिकीट दिले नाही. ‘‘गोव्यातील जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना तिकीट न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’’ असे ती म्हणाली.

बहुमत मिळाल्यानंतर एका तासात काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करेल, असे त्या म्हणाल्या.

“महिला सक्षमीकरण, क्रीडा आणि आमच्या जाहीरनाम्यात दिलेली इतर सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. पाणीपुरवठ्याचा प्रश्नही आम्ही सोडवू.’’ असे कुडचडेचे उमेदवार अमित पाटकर म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar