भाजपाला धडा शिकवण्यासाठी गोव्यातील टॅक्सी मालकांचा काँग्रेस पक्षाला पाठींबा

.

 

भारतीय जनता पक्षाला धडा शिकवण्यासाठी गोव्याच्या टॅक्सी व्यवसायिकांनी त्यांच्या मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवाराला किंवा सक्षम उमेदवाराला निवडून आणण्याचे ठरवले आहे अशी माहिती टॅक्सी व्यवसायिकांचे नेते बाप्पा कोरगावकर यांनी कळंगुट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी रोहिदास नाईक, योगेश गोवेकर, जयदेव शिरोडकर व इतर टॅक्सी व्यवसायिक उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांना संपवले, एप बेस टॅक्सी सुरू करून गोवा सरकारने स्थानिक व्यवसायिकाच्या पोटावर पाय दिला. गोमंतकीय टॅक्सी व्यवसाय संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा सरकारला धडा शिकवण्याकरिता काँग्रेस सारख्या प्रबळ पक्षाची गरज असल्याचे बाप्पा कोरगावकर यांनी सांगितले.
गोव्यात एप बेस टॅक्सी सेवा सुरू करून गोव्यातील भाजपा सरकारने स्थानिकांच्या व्यवसायाला संपवण्याचा घाट घातला, विनंती, विनवण्याकरून ती सेवा बंद करण्याकरिता काहीच केले नाही, कोणतेही सहकार्य केले नाही, फक्त झुलवत ठेवले अश्या या भाजपा सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे योगेश गोवेकर यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar