केजरीवालांच्या योजनामध्ये आहेत छुपा अजेंडा: काँग्रेस

.

पणजी: एआयसीसी सरचिटणीस अजय माकन यांनी शनिवारी सांगितले की आपचा दिल्ली मॉडेल महागाई आणि वीज बिलावरील छुपे शुल्कांनी भरलेला आहे. “अरविंद केजरीवाल गोव्याला खोटी आश्वासने देत आहेत, कारण दिल्लीत दिलेली वचने ते पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.” असे ते म्हणाले.

अजय माकन यांनी शनिवारी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल गोव्यातील लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

यावेळी एआयसीसीच्या प्रवक्त्या अलका लांबा, काँग्रेस नेत्या रागिनी नायक, जीपीसीसीचे प्रवक्ते तुलिओ डीसूझा आणि सुनील कवठणकर उपस्थित होते.

“केजरीवाल यांनी 2015 साली 8 लाख रोजगार निर्माण करण्याची योजना जाहीर केली होती. मात्र त्यात तो अपयशी ठरला आहे. इथे गोव्यात त्यांनी बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र दिल्लीत ही योजना नाही.’’ असे माकन यांनी सांगितले.

“त्यांची मोफत वीज आश्र्वासन हे गोवावासीयांना दिलेले आणखी एक खोटे आश्र्वासन आहे. दिल्लीचे वीज दर खूप महाग आहेत. त्यामुळे तो फक्त लोकांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.’’ असे ते म्हणाले.

“कोविड काळात आपचे मोहल्ला क्लिनिक बंद होते. सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे दिल्लीत अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाला.’’ असे त्यांनी निदर्शनास आणले.

“कोविड मृत्यूचे प्रमाण दिल्लीत सर्वाधिक होते.” असे ते म्हणाले.

ते म्हणाले की दिल्लीत प्रत्येक वेळी आरोग्य क्षेत्रावरील अर्थसंकल्प विनावापर राहतो. “आपने दिल्लीत एकही नवीन रुग्णालय बांधलेले नाही. सध्याची सर्व ३९ सरकारी रुग्णालये काँग्रेस सरकारने बांधली होती.’’ असे ते म्हणाले.

रागिनी नायक म्हणाल्या की, महिलांवर कोणताही गुन्हा घडल्यास भाजप पीडितांना दोषी ठरवते. ‘‘गोव्यातील भाजप सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस येथे महिलांवरील गुन्हे वाढत आहेत.’’ असे ती म्हणाली.

गोव्यात काँग्रेस पक्ष अधिकाधिक महिला पोलीस ठाणी स्थापन करणार असून महिलांना सुरक्षा देणार असल्याचे नायक यांनी सांगितले.

‘‘गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करेल, असा मला विश्वास आहे.’’ असे ती म्हणाली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar