सहा महिन्यात म्हापश्यात ज्योशुआ डिसोझा यांनी अनेक विकासकामे राबवली: शुभांगी वायंगणकर

.

म्हापसा (न. प्र.):- म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीतील शेवटच्या 6 महिन्यात शहरातील कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली. निवडून आल्यानंतर अडीच वर्षाचा कालावधी त्यांना मिळाला होता त्यातील 2 वर्षे कोविडच्या काळात गेले. त्यांनी या ६ महिन्यात वेगवेगळ्या रूपाने कामे केली व मुख्यमंत्र्याकडून म्हापशाच्या विकासासाठी १ कोटी रुपये मान्यता मिळवल्याची नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी सांगितले.
म्हापसा येथील उत्तर गोवा भाजपाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, नगरसेवक आशीर्वाद खोर्जूवेकर, विराज फडके, साईनाथ राऊळ, सुशांत हरमलकर, स्वप्नील शिरोडकर, प्रिया मिशाळ, किशोरी कोरगांवकर, बाबरा कारस्को उपस्थित होते. पुढे बोलताना वायंगणकर म्हणाल्या की गोवा स्वतंत्र झाल्यापासून आताच्या मुख्यमंत्र्यांनी जसा निधी दिला तसा कोणीच दिला नाही. म्हापशासाठी मुख्यमंत्र्यांनी खास एक कोटींचा निधी मंजूर केला. पालिका जवळ असलेली इमारत तिचे बांधकाम, शांतादुर्गा हॉटेल जवळील सौचालय, कचरा उचलण्याचे काम, करण्यात येणार आहे. म्हापसा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला असून या मतदार संघाला आणखीन 10 वर्षे मिळाली तर त्याचा चेहरामोरा बदलला जाईल असे त्यांनी सांगितले.
तर चंद्रशेखर बेनकर यांनी बोलताना सांगितले की विरोधक म्हणतात 22 वर्षे म्हापश्यात काहीच झाले नाही. बांधण्यात आलेला बस स्थानकावर टीका चालू आहे. आताचे काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर हे फ्रान्सिस डिसोझा यांच्या बरोबरीने काम करत असताना त्यांना विकास कामे दिसली नाही का? आताच्या पहिल्या टप्प्याच्या बस स्थानकाच्या जागी पावसाच्या दिवसात चिखलाचे साम्राज्य पसरत होते. त्यातच टॅक्सी, बसेस उभ्या राहत असे व त्या ठिकाणी कामगारांची वस्ती होती यांचा विचार करून त्याठिकाणी आताचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी पहिल्या टप्प्याच्या बस स्थानकाचे काम केले. रायन ब्रागांझा हे आमच्या बरोबर नगराध्यक्ष होते पण त्यावेळी त्यांनी आवाज केला नाही आणि आता आमदाराविरोधात भाष्य करत आहेत. सुधीर कांदोळकर हे 2 वेळा नगराध्यक्ष झाले त्यावेळी त्यांना रवींद्र भवनासाठी जागा उपलब्ध करून देता आली नाही आणि आता म्हापश्यात रवींद्र भवन नसल्याचे लोकांना सांगत सुटले आहे. हे किपत खरे आहे असे ते म्हणाले.
नगरसेवक सुशांत हरमलकर यांनी बोलता ना सांगितले की कोविडच्या 2 वर्षाच्या काळात लोकांना आमदारांनी व नगरसेवकांनी ऑक्सिमीटर, कडधान्य, रुग्ण वाहिका सेवा, जेवणाची व्यवस्था पुरवण्याचे काम केले. त्यानंतरच्या काही महिन्यात अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स सुरू केल्याचे ते म्हणाले. तर नगरसेवक विराज फडके यांनी सांगितले सुधीर कांदोळकर हे गेल्या 25 वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांनी आपल्या मरड भागामध्ये फक्त इमारती उभारण्याचेच काम केले. पालिका आमच्या हातामध्ये आल्यावर कधी झाले नाही असे गणेश चतुर्थी, दिवाळी, ख्रिसमस, या सणासुदीच्या काळात व्यापारी व ग्राहकांना व्यवस्थितपणे बाजार करण्यासाठी सोय करून दिली. पार्किंगची व्यवस्था काही प्रमाणात विस्कळीत होत आहे ती पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर नगरसेवक आशीर्वाद खोर्जूवेकर यांनी सांगितले की सुधीर कांदोळकर नगराध्यक्ष असताना त्यांच्याकडून काही झाले नाही आणि आता जोशुआ डिसोझा नवीन विचारांचे तरुण आमदार असून वेगवेगळी कामे करत आहेत ती त्यांना पाहवत नाहीत. जोशुआ डिसोझा यांनी अंडर ग्राउंड केबलिंग, कुचेली येथे कचरा प्रकल्प व इतर कामे हाती घेतलेली आहे असे असतानाही त्यांच्यावर टीका करणे म्हणजे विरोधक जाणूनबुजून विरोध करत असल्याचे आशीर्वाद खोर्जूवेकर म्हणाले. तर स्वप्नील शिरोडकर यांनी सांगितले की कांदोळकर हे चांगले काम करत असल्याने आम्ही मागच्यावेळी त्यांना पाठिंबा दिला व नगराध्यक्ष केले. परंतु आमच्या विरोधातच पालिका निवडणुकीत काम करून आम्हाला पाढण्याचे काम करू लागले. साईनाथ राऊळ यांनी सांगितले की सुधीर कांदोळकर यांनी प्रथम आपल्या प्रभागमध्ये काय चालते आणि कोणत्या योजना हव्यात त्या पहिल्यांदा पाहणे गरजेचे आहे. म्हापसा पालिका मार्केट हा मरड मध्ये येत असल्याने तो त्यांच्याच प्रभागात येतो. असे असताना त्यांच्या प्रभागात कामे झाली नाहीत ती करून घेण्याचे काम त्यांचे होते पण 2 वेळा नगराध्यक्ष होऊनही त्यांनी न केल्याची टीका राऊळ यांनी केली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar