काँग्रेस- गोवा फॉरवर्ड नेते 26 जागांसाठी आशावादी

.

 

पणजी: स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी गोव्यातील लोकांनी विश्वास दाखवून जवळपास २६ जागा मिळवण्यास पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी आपल्या उमेदवारांसह शहरातील हॉटेलमध्ये मतदानाचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, जीएफपीचे अध्यक्ष विजय सरदेसाई आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चोडणकर म्हणाले की, या निवडणुकीच्या माध्यमातून गोवावासीयांनी देशाला वेगळी दिशा दाखवली आहे. “लोकांनी मतांच्या विभाजनाचे समर्थन केले नाही. त्यांनी भाजपला हरवण्यासाठी मतदान केले. मी सर्व गोवावासियांचा आभारी आहे.” असे चोडणकर म्हणाले.

“भाजपला दहापेक्षा कमी जागा मिळतील. त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पराभूत होतील.” असे चोडणकर म्हणाले.

सरकारी कर्मचाऱ्यांनी मतदान (बॅलेट व्होट) करताना भाजपाच्या दबावाखाली येवू नये असे आवाहनही त्यांनी केले. “भाजप सरकारची मुदत संपली आहे. काँग्रेस नवीन सरकार स्थापन करत आहे.” असे ते म्हणाले.

कामत म्हणाले की, लोकांच्या प्रतिसादावरुन असे दिसून येते की त्यांनी भाजपला हरवण्यासाठी मतदान केले आहे. “आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी गोव्यातील जनतेला सलाम करतो.” असे कामत म्हणाले.

ते म्हणाले की, निकाल लागल्यानंतर भाजपचा अहंकार कमी होईल.

गोव्यातील लोकांकडून प्रेम आणि आपुलकी मिळाल्याने आनंद होत असल्याचे राव म्हणाले. “आम्ही लोकांचा आवाज ऐकला आणि नवी काँग्रेस दिली.” असे ते म्हणाले.

काँग्रेस नेत्यांनी खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, ज्येष्ठ नेते पी चिदंबरम, के सी वेणुगोपाल आणि इतर नेत्यांचे गोव्यात प्रचार केल्याबद्दल आभार मानले.

भाजपच्या व्हायरसचा नायनाट केल्याबद्दल सरदेसाई यांनी गोव्यातील जनतेचे आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar