काँग्रेसच्या नेत्यांनी दिवास्वप्ने पाहू नयेत शेट – तानावडे : राज्यात सत्ता भाजपचीच येईल

.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिवसाढवळ्या स्वप्ने पडू लागली आहेत. विधानसभेसाठी विक्रमी मतदान झाल्याने त्यांना लोकांनी काँग्रेसला मते दिली असून भाजपा एकेरी संख्याही गाठणार नाही, असे ट्विट श्री. चोडणकर यांनी केले आहे. यावर प्रतिक्रया देताना श्री शेट – तानावडे यांनी जोरदार हल्ला चढवला.
काँग्रेसचे नेते दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर यांना हल्ली वायफळ बडबड करण्याची सवय लागली आहे. राज्यात चांगले मतदान झाले म्हणजे ते भाजपा विरुद्ध झाले, असा जावईशोध त्यांनी लावला आहे. येत्या १० मार्च रोजी निकाल लागल्यानंतर कौन जीता कौन हारा, हे कळून येईल, अशी टीका श्री. शेट – तानावडे यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यातील मतदान नुकतेच झाले आहे. याचा निकाल लागण्यास अजून महिनाभर लागेल. मात्र सत्तेच्या खुर्चीची हाव काँग्रेसला आत्तापासूनच लागली आहे. लोकांनी कोणाच्या पारड्यात आपले दान टाकले आहे, याची प्रतीक्षा करण्याचीही त्यांची तयारी नाही. अर्थात, आमचा पक्ष जिंकेल हे म्हणण्याचा त्यांचा अधिकार आहे. पण भाजपाला एकेरी संख्याही गाठता येणार नाही वगैरे असल्या भंपक गोष्टी त्यांनी बोलू नयेत, अशी कडवट टीका श्री. शेट – तानावडे यांनी केली.
भाजपचा जनतेवर पूर्ण विश्वास आहे. भाजपाने गेल्या दहा वर्षांत देशात आणि राज्यात केलेला विकास लोकांना माहीत आहे. संधी मिळूनही काँग्रेसने राज्याची वाट लावल्याचे गोमंतकीय जनतेला माहीत आहे. त्यांचे घोटाळे आणि त्यांचा भ्रष्टाचार लोकांनी पहिला आहे. यामुळे पुढील सत्ता काँग्रेसची येईल, अशी दिवास्वप्ने पाहणे त्यांनी सोडून द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
भाजपाचे सर्व राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते गेले एक वर्षे रात्रंदिवस मेहनत घेत होते. निवडणुकीची तयारी पूर्वीपासून सुरू होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांच्या कार्यशैलीला कंटाळून पक्ष सोडून जात होते. याचे भान न राहिल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही पक्षाला रामराम केला. गिरीश चोडणकर यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. आमची चिंता करू नये, असा सल्लाही श्री. शेट – तानावडे यांनी दिला. या निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल, यात तिळमात्र शंका नाही. निकाल लागेपर्यंत काँगेसच्या दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर यांनी हव्या तेवढ्या शाब्दिक गमजा माराव्यात, असेही सदानंद शेट – तांनावडे म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar