खोब्रावाडो, कळंगुट येथील कृष्णा दिपक परुळेकर यांनी भाड्याला दिलेल्या घरात सिलेंडर स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन खोल्या जळून खाक झाल्या, या आगीत सुमारे एक लाख विस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना दि.17 रोजी रात्रौ 9.30 च्या सुमारास घडली.
पिळर्ण अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहिती नुसार खोब्रावाडो कळंगुट येथे सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची खबर अग्निशामक दलास मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान आर. एन. नाईक, एस. आर. पर्रीकर, पी. एन. मांद्रेकर, डी. ए. गावडे, विशाल पाटील, आर. ए. पांढरे व एस. जि. शेट्ये यांनी आगीवर नियंत्रण आणले. यावेळी एक सिलेंडर चा स्फोट झाला होता तर दुसरा गळती होऊन आग लागली होती, जवानांनी दोन्ही सिलेंडर बाहेर काढले, पण तोपर्यत लागलेल्या आगीत तिन्ही खोल्यासह घरातील कपाटातील सोन्याचे दागिने, कपडे, पलंग, रिफ्रेजेटर व इतर सामान जळून खाक झाले. आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा अंदाज आहे.