पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपने केला वायरलेसचा वापर, मतदारांना 10 हजारांची ऑफर : चोडणकर

.

 

पणजी: विधानसभा निवडणूकीत हरणार या भीतीने गोंधळलेल्या भाजपने बॅलट मतदानासाठी दहा हजार रुपयांची ऑफर देण्यात सुरुवात केल्याचा आरोप करत, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी निवडणूक आयोगाने याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली. मतदारांची तपशीलवार यादी मिळविण्यासाठी भाजपने ‘पोलीस वायरलेस सेवे’चा वापर केला आहे, असेही ते म्हणाले.

गिरीश चोडणकर यांनी शनिवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, काँग्रेसला मिळालेल्या प्रतिसादामुळे भाजपला धक्का बसला आहे. यावेळी काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

चोडणकर म्हणाले की, प्रमोद सावंत आणि भाजप नेत्यांनी अधिकृत वायरलेस पाठवून पोस्टल बॅलेट निवडलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे.
“राजकारणाच्या हेतूने ते अधिकृत वायरलेस कसे वापरू शकतात.” असा प्रश्न त्यांनी केला.

भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी पोलिस आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांची ऑफर दिली जाते, असा आरोप त्यांनी केला.

“ज्या मतदारसंघात थोड्याशा फरकाने कोणीही जिंकू शकतो अशी परिस्थिती असते त्या मतदारसंघात पोस्टल मतदान महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या मतदारांना ओळखून त्यांना आपल्या बाजूने आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. “असे त्यांनी निदर्शनास आणले.

“भाजपने गोव्याची लोकशाही आधीच उद्ध्वस्त केली आहे. आता ते मतदारांना पैसे देऊन पोस्टल बॅलेटचे पावित्र्य नष्ट करण्याचा
प्रयत्न करत आहेत.” असे चोडणकर म्हणाले.

“आम्ही या घटनेबद्दल निवडणूक आयोगाला पत्र लिहू आणि कारवाईची मागणी करू.” असे ते म्हणाले.

चोडणकर यांनी माहिती दिली की, ज्यांनी टपाल मतपत्रिका अद्याप टाकल्या नाहीत त्यांची तपशीलवार यादी आणि त्यांच्या मतदारसंघाची नावे भाजपने मागवली आहेत.
“भाजपने बॅलेट पेपरसाठी अर्ज केलेल्या पोलिसांची संख्या आणि मतदान केलेले आणि अद्याप मतदान करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांची संख्या याबद्दल माहिती मागवली आहे. त्यांनी नावे, मतदारसंघ आणि त्यांचे फोन नंबर मागितले आहेत.” असे ते म्हणाले.

आदर्श आचारसंहिता लागू असली तरी काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे हे सरकारी कर्मचाऱ्यांवर सूड उगवण्यासाठी अधिकाऱ्यांवर बदलीचे आदेश देण्यासाठी दबाव टाकत असल्याचे चोडणकर म्हणाले.
“विश्वजित राणे जीएमसीच्या अधिकार्‍यांना सांगत आहेत की ते मुख्यमंत्री होणार आहेत, त्यामुळे त्यांच्या आदेशाची पूर्तता झाली पाहिजे. ते अधिकाऱ्यांवर दबाव कसा आणू शकतात.” असा प्रश्न त्यांनी केला.

 

भ्रष्ट भाजप नेते प्रमोद सावंत कार्यालयाचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने चौकशी करून कारवाई करावी, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाला की सावंत साखळी मधून पराभूत होतील.

“फक्त भाजपलाच  त्यांचे होर्डिंग लावण्याची परवानगी का दिली आणि इतर पक्षांना का दिली नाही ?” असा प्रश्न त्यांनी केला

निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागत आहे असा आरोप त्यांनी केला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar