पोस्टल बॅलेटवर प्रभाव टाकणारी कृत्ये थांबवण्यासाठी काँग्रेसचे निवडणूक आयोगाला  पत्र

.

 

पणजी: विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची जाणीव झाली आहे आणि त्यामुळे पोस्टल बॅलेट मतदारांवर दबाव आणण्याचाप्रयत्न केल्याचा दावा करून, काँग्रेस पक्षाने नवी दिल्ली येथील मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार सादर करुन सुद्धा अद्याप कारवाई झालेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे  अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, निवडणूकीची आचारसंहिता लागू आहे, तथापि सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांनी पोस्टल बॅलेट करणाऱ्या मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटले आहेत आणि त्यांच्यावर दबाव टाकला आहे.

“राज्य सरकारची यंत्रणा आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करणार्‍या मतदारांना धमकावण्याचे प्रकार सुरु केले आहे. सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे.” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पोस्टल बॅलेटची निवड केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी मिळविण्यासाठी भाजपने ‘पोलीस वायरलेस सर्व्हिस’चा वापर केल्याचा आरोप चोडणकर यांनी शनिवारी केला होता.

“आम्हाला ठोस माहिती मिळाली आहे की पोलीस मुख्यालय, पणजी, गोवा द्वारे 17 आणि 18 फेब्रुवारी 2022 रोजी गोव्यातील सर्व पोलीस ठाण्यांना एक वायरलेस संदेश प्रसारित करण्यात आला होता, ज्यामध्ये खालील माहिती मागविण्यात आली होती:- i. बॅलेट पेपरसाठी किती पोलिस कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत? ii किती जणांनी मतदान केले? iii किती जणांनी अजून मतदान केलेले नाही?” असे  पत्रात पुढे म्हटले आहे.

चोडणकर यांनी तातडीने कार्यवाही करून निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य व लोकशाहीची मूल्ये अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे. भाजप या मतदारांना आमिषे दाखवत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

“सर्व पोलिस ठाण्यांना प्रसारित करण्यात आलेले वायरलेस संदेशचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी चौकशी करण्यात यावी आणि त्यामध्ये गुंतलेल्यांवर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.” अशी मागणी त्यांनी केली.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar