मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठीच छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचे स्वार्थी राजकारण्यांचे षड्यंत्र ! – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

.

 

महाराष्ट्रातील युवा पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारलेली आहे. तिची दिशा भरकटवण्यासाठी 20 वर्षांपूर्वी राजकीय पक्षांनी काही ब्रिगेडी संघटनांना हाताशी धरून इतिहासाची तोडमोड करून छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानप्रेमी होते, त्यांच्या सैन्यात मुसलमान सैन्य होते, त्यांनी मशिदी बांधल्या, मशिदींना देणग्या दिल्या, त्यांना मुसलमान गुुरु होते आदी जाणीवपूर्वक सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचा प्रकार चालू आहे. एकदा का छत्रपती शिवाजी महाराजांची मुसलमानप्रेमी छबी निर्माण झाली की, उद्या आपल्यालाही छत्रपती शिवरायांचे नाव सांगून मुसलमानांचे लांगूलचालन करून राजकीय स्वार्थ साधता येईल, असे राजकीय पक्षांचे षड्यंत्र आहे. खरे तर छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ ठरवणे, हा त्यांच्या शौर्याचा अपमान आहे. असे करणार्‍या ‘जयचंदां’ना हिंदूंनी ओळखले पाहिजे. छत्रपती शिवरायांचे ‘हिंदवी स्वराज्या’चे खरे विचार अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे विचार कृतीत आणले पाहिजेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरवण्याचे षड्यंत्र !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादत ते बोलत होते.

या वेळी लेखक आणि अभ्यासक अधिवक्ता सतीश देशपांडे म्हणाले की, वर्ष 1961 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, छत्रपती शिवराय नसते, तर पाकिस्तानची सीमा आपल्या आसपास दिसली असती. हे वाक्य खूपच महत्त्वपूर्ण आहे. तसेच मुघल इतिहासकार तारुकी अली नरूला, तसेच आदिलशाह यांची कागदपत्रे तपासल्यावर त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणात अनेक मशिदी उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळेच अफजलखानाला पाठवले गेले. यावरून छत्रपती शिवराय हे ‘सेक्युलर’ कधीही नव्हते आणि नाहीत.

या वेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे म्हणाले की, केवळ छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ करण्याचा प्रकार नाही, तर ते देव मानत नव्हते, धर्म मानत नव्हते, असाही ठसवण्याचा भयंकर प्रयत्न ब्रिगेडी लोकांकडून चालू आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचे निस्सीम भक्त होते आणि समर्थ रामदासस्वामी हे त्यांचे गुरु होते, हे छत्रपती शिवरायांचे वंशज मानतात. केवळ हिंदूंना त्यांच्या ध्येयापासून विन्मुख करण्यासाठी प्रत्यन चालू आहे. या वेळी सव्यासाची गुरुकुलम्चे प्रधान आचार्य लखन जाधव म्हणाले की, आज कार्यकर्त्यांना केवळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा द्यायला लावल्या जात आहेत; पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, प्रेरणा, राज्यकारभार शिकवला जात नाही. महाराजांचे गड-किल्ले भग्न होत असतांना त्यांचे रक्षण न करता त्यावर मदिशी, दर्गे उभारले जात आहेत. छत्रपती शिवरायांनी जे 36 वर्षे लढून मिळवले ते धुळीस मिळवण्याचे काम चालू आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar