श्री शांता विद्यालयाचा शापोरा किल्ल्यावर भव्य शिवजयंती सोहळा संपन्न

.

 

निश्चयाचा महामेरू ,अखंड स्थितीचा निर्धारु, पुण्यवंत , यशवंत, दानशील , धर्मशील, अशा गुणांनी समृद्ध असे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श योद्धा ,उत्कृष्ट शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जगामध्ये आणि विशेष करून मराठी इतिहासामध्ये एक उच्च स्थान त्यांना मिळालेला आहे त्यांच्या अंगी असलेले राष्ट्रभक्ती दृढनिश्चयी एकात्मता अशा असंख्य आमच्यामध्ये आत्मसात करण्याचा निश्चय करण्याचा आजचा हा दिवस आहे. असे प्रतिपादन सचिन मदगे यांनी केले. विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री. शांता विद्यालयाने अंजूने शापोरा किल्ल्यावर शिवजयंती मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी केली यावेळी ते प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते.
श्री.शांता विद्यालयाचे सायकलस्वार विद्यार्थी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, नागरिक, ग्रामस्थ यांच्या संगे शापोरा किल्ल्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका शिक्षक श्री जगदीप कारापूरकर यांनी साकारली होती तर विद्यार्थिनी कुमारी र्शवाणी पेडणेकर यांनी जिजामाताची भूमिका साकारली होती व विद्यार्थी कुमार सान्वीक केरकर व कुमार विशाल बेन यांनी मावळ्यांची भूमिका साकारली होती. शिवरायांचा नामघोष व जयघोष करत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवोली भागातील नागरिकांनी ठिकठिकाणी शिव पूजन केले.

शापोरा किल्ल्यावर कार्यक्रमाची सुरुवात शिव पूजनानेव शिवगर्जनाने करण्यात आली . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री अर्जुन गावस उपस्थित होते तसेच मान्यवर श्री गौरीश साळगावकर ,श्री गोविंद वाघ ,श्री मंगेश कासकर, शाळेचे व्यवस्थापक शिवाजी पाटील, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सुनील गावकर, मुख्याध्यापिका प्रजिता सांगाळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक वर्ग , ग्रामस्थ पर्यटक व विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षक श्री उमेश महालकर यांनी शब्द सुमनांनी मान्यवरांचे स्वागत केले व त्यांच्या कार्यकृत्याचा परिचय करून दिला.

यावेळी प्रमुख पाहुणे श्री अर्जुन गावस यांनी शिवरायांची व शिवजयंती चे महत्व विषद केले. तसेच ऊर्जात्मक असे सांघिक गीत शिक्षक श्री.संगम चोडणकर यांनी सादर केले तसेच शिक्षक श्री. नवनाथ सावंत यांनी शिवरायांची यशोगाथा सांगणारा पोवाडा सादर केला. त्याचप्रमाणे विद्यार्थिनी कुमारी र्शवाणी पेडणेकर हिने जिजाबाई यांच्यावर आधारित नाट्यछटा सादर केली. शिवजयंती निमित्त प्रमुख पाहुणे श्री अर्जुन गावस व प्रमुख वक्ते श्री सचिन मगदे यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवभक्तांसाठी श्री गौरीश साळगावकर ,श्री देवा सावंत ,श्री राजेंद्र डांगी, शिव शंकर मयेकर यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती . तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी श्री.सातेरी देवस्थान समिती, श्री अंकित साळगावकर ,श्री जगन्नाथ गावकर,श्री. सत्चीत नाईक , श्री प्रताप खोर्जुवेकर, यांनी भरपूर सहकार्य केले कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ.प्रजिता सांगाळे व पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. सुनील गावस्कर यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन शिक्षक श्री विश्वास सांगळे यांनी केले व आभार प्रकट विषया आमणेकर गावस यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar