गोवा सरकारच्या मिनिस्ट्री of टेक्सटाईल्स च्या सहकार्याने म्हापसा परिसरातील लोकांना हॅंडीक्राफ्ट टेक्सटाईल्स आणी हॅन्डलूम कलाकुसरीच्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून दस्तकार नतुरा उत्सव या नावाने प्रदर्शन व विक्री सुरू करण्यात आली

.

 

गोवा सरकारच्या मिनिस्ट्री of टेक्सटाईल्स च्या सहकार्याने म्हापसा परिसरातील लोकांना हॅंडीक्राफ्ट टेक्सटाईल्स आणी हॅन्डलूम कलाकुसरीच्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून दस्तकार नतुरा उत्सव या नावाने प्रदर्शन व विक्री सुरू करण्यात आली असल्याची माहिती संयोजक महावीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म्हापसा येथील टुरिस्ट हॉल मध्ये सुरू करण्यात आलेल्या या ठिकाणी महिलांसाठी खादी व हॅन्डलूम ची वस्त्र प्रावरणे उदा. कुर्ता, टॉप, साडी, कॉटन साडी, पुरुषांचे कुर्ते, मुलांसाठी कपडे, खेळणी, चांदीचे दागिने, पितळेच्या कलाकुसरीच्या वस्तू व इतर अनेक प्रकारचे घरगुती सामान जे हस्तगीरांनी घरी बनवलेल्या आहेत त्या विक्री साठी उपलब्ध आहेत, सद्या एकूण 27 स्टॉल्स या ठिकाणी असून त्यात आणखी वाढ होणार आहे. राजस्थान, लखनौ, केरळ, तामिळनाडू व भारतातील इतर राज्यातून हस्तकारागीर आपल्या वस्तू घेऊन आलेले आहेत. या ठिकाणी इतर ठिकाणा पेक्षा 40 ते 50 टक्के दर कमी असूनही आम्ही हॅन्डलूम वस्तूवर 20 टक्के व दागिने व हॅंडीक्राफ्ट वस्तूवर 10 टक्के सुट देतो, ग्राहकांकडून जिएसटी सुद्धा आकारला जाणार नसून 13 मार्च पर्यत प्रदर्शन व विक्री सुरू रहाणार असल्याने येथील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावीर यांनी यावेळी केले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar