मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या पक्षांवर कारवाई करण्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाचे काँग्रेसने केले स्वागत – पोस्टल बॅलेटची कालावधी कमी असावी

.

 

पणजी: पोस्टल बॅलेटवर प्रभाव टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या व त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत करत, कॉंग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी पोस्टल बॅलेटसाठी दिलेला कालावधी कमी असावा, असे मत व्यक्त केले आहे.

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दावा केला होता की भाजपने पोस्टल बॅलेटवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करताना मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटले होते. गोव्यातील सीईओ तक्रारी दाखल करूनही अशा बेकायदेशीर गोष्टींविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने या संदर्भात कारवाई करण्यासाठी काँग्रेसने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली यांना लेखी तक्रार केली होती.

आतां, काँग्रेसच्या तक्रारींची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पणजीकर म्हणाले की सीईओला आपली चूक लक्षात आली आणि आता त्यांनी मतदारांना आमिष दाखविणाऱ्या पक्षांना इशारा दिला आहे.

“पोस्टल बॅलेटसाठी 10 मार्चपर्यंत दिलेली मुदत, राजकीय पक्षांना मतदारांवर प्रभाव टाकण्याची संधी देत ​​आहे. ते पाच ते सात दिवसांच्या दरम्यान अल्प कालावधीचे असावे. मी सीईओंना विनंती करतो की त्यांनी याची नोंद घ्यावी आणि पुढील निवडणुकांदरम्यान प्रक्रियेत सुधारणा करावी.” असे पणजीकर म्हणाले.

पणजीकर म्हणाले की, काँग्रेसने तक्रार केल्यावर निवडणूक आयोगाने सतर्क राहायला हवे होते. “आमच्या पहिल्या तक्रारीनंतर त्यांना कारवाई करण्यात अपयश आले. त्यामुळे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपला पुरेसा वेळ मिळाला.” असे ते म्हणाले.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाचे कायदे लागू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपने राज्यभर जी आपली होर्डिंग्स लावली आहे ती सुद्धा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.

“निवडणुकीच्या प्रक्रियेत, निवडणूक आयोग सर्वोच्च आहे आणि त्यामुळे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.” असे पणजीकर म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar