शिवजयंती निमित्त आजोबा नगर येथील ग्रामस्थांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक आजोबा नगर आजोबा देवस्थान होंडा तिस्क व होंडा पोलिस स्टेशन येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी बाल गोपाळांनतर्फे लाठी काठी तसेच आजोबा नगर येथील महिलांनी पहिल्यांदाच आपला लेझीमचा कार्यक्रम सादर केला.त्यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांची लाठी काठी व महिला वर्गाचे लेझीम त्यामुळे मिरवणुकीला रंगत आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विशांत सोलेयकर , स्नेहा विनोद देसाई, ह्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आजोबा नगरात द्या रहिवाशांनी आपली कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केली. त्यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.