मराठी साहित्याचे प्रकारांतर आणि माध्यमांतर’ या विषयावर राष्ट्रीय ई-परिसंवादाचे आयोजन

.

 

‘मराठी साहित्य’ हे सर्जनशील लेखनासाठी सुपरिचित आहे. यातील काही दर्जेदार मराठी कथा-कादंबऱ्यांचे प्रसंगानुरूप नाटकांमध्ये प्रकारांतर तथा चित्रपटांमध्ये आणि दूरदर्शन मालिकांमध्ये माध्यमांतर करण्यात आले आहे. मराठी साहित्याच्या या स्थित्यंतराला वाचक आणि रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद प्राप्त होत आहे. या सर्व कार्यक्षम साहित्यिक प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना लाभदायी ठरणारी असून मराठी साहित्यातील स्थित्यंतराचा संशोधनात्मक परामर्श घेण्याच्या उद्देशाने गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाने ‘मराठी साहित्याचे प्रकारांतर आणि माध्यमांतर’ (Marathi Literature: Transform & Trans-media) या विषयावर दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी एक दिवसीय राष्ट्रीय ई-परिसंवादाचे आयोजन केले आहे.

 

सकाळी १० वाजता आरंभ होणाऱ्या या राष्ट्रीय ई-परिसंवादामध्ये डॉ. कैलास अंभुरे (सहायक प्राध्यापक, मराठी भाषा व वाङ्मय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) बीजभाषण करणार आहेत. सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार विश्वास पाटील ‘पानिपत कादंबरीचे रणांगण नाटकांमध्ये प्रकारांतर’ या विषयावर शोधनिबंध प्रस्तुत करणार आहेत. त्यानंतर ‘मराठी कादंबऱ्यांचे नाटकांमध्ये प्रकारांतर आणि चित्रपटांमध्ये माध्यमांतर’ या विषयावर डॉ. प्रशांत गुणवंतराव चौधरी (मराठी विभाग प्रमुख आणि प्रभारी प्राचार्य, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, उस्मानाबाद) शोधनिबंध सादर करणार आहेत. अशी माहिती परिसंवादाचे संयोजक डॉ. विनय मडगांवकर यांनी दिली आहे. प्रस्तुत परिसंवादाच्या आयोजनात विभग प्रमुख डॉ. सुनीता उम्रस्कर, प्रा . विनायक लक्ष्मण बापट, प्रा. चिन्मय मधू घैसास आणि प्रा. पूर्वा पंडित वस्त यांचा सहभाग असणार आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar