प्रत्येक विद्यार्थीने आपले घ्येय निश्चित करुन वाटचाल करावी म्हणजे आयुष्यात जे प्राप्त करायचे असते त्या अंतिम ध्येयाकडे आपण पोहचू शकतो. अन्यथा भरकटत जातो या ठिकाणी येऊन मला आनंद झाला, कारण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन संस्कृतीचे जतन केलेले विध्यार्थी या ठिकाणी बघायला मिळाले आणि जिवनात संस्कृत जतनाला फार महत्त्व आहे. असे उदगार उदय प्रभुदेसाई यांनी वळपे पेडणे येथे काढले.
विकास हायस्कूल मध्ये गणित दिनाविषयी घेतलेल्या स्पर्धचा बक्षीस वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ गणितदिन निमित्त वळपे येथील विकास हायस्कूलमध्ये गोवा राज्य मंडळाने विज्ञान आणि तंत्रज्ञान सालीगाव यांच्या सहकार्याने आनलाईन पद्धतीने विविध स्पर्धा च्या बक्षीस वितरण सोहळा हायस्कूल च्या प्रांगणात पार पडला. यावेळी भालचंद्र हिरोजी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष उल्हास देऊलकर व मुख्याध्यापक नागेश गोसावी उपस्थित होते. न हि ज्ञानेन सदृश पवित्रमिह विद्यते ” अथात ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगात कोणतीही नाही
आणि ज्ञानीयाचा तर आदर सत्कार होत असतो. आज विज्ञान व तंत्रज्ञानामुळे जग एवढे लहान झाले आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात आपण घर बसला पोचू शकतो, असे उदगार भालचंद्र हिरोजी यांनी काढले.
आज वैज्ञानिकांनी देशाला पुढे आणण्याचे काम करून विविध संस्था निर्माण झाला आहे, त्यामुळे प्रत्येकाने आत्मनिर्भर व स्वयंभू बनून स्वतः ला सिद्ध करावे असे मुख्याध्यापक नागेश गोसावी म्हणाले. यावेळी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष उल्हास देऊलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गणित दिनानिमित्त घेतलेल्या स्पर्धांचे निकाल खालीलप्रमाणे प्रतिकृती प्रदर्शन प्रथम क्रमांक- मांद्रे हायस्कूल, द्वितीय क्रमांक- व्हायकाउंट हायस्कूल, तृतीय क्रमांक- प्रज्ञा हायस्कूल, उतेजनाथ प्रथम क्रमांक ज्ञानदीप हायस्कूल कासारवणै, विकास हायस्कूल वळपे
पाॅवर पाईंट प्रेझेंटेशन स्पर्धा
प्रथम – मांद्रे हायस्कूल, द्वितीय_ हरमल पंचक्रोशी हायस्कूल, तृतीय_ व्हिसकाऊट आफ पेडणे उतेजनाथ प्रथम क्रमांक-प्रज्ञा हायस्कूल, भगवती हायस्कूल, पेडणे, निबंध लेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक- प्राजक्ता गवंडी ( सेंट जोसेफ हायस्कूल) द्वितीय- प्राची नाईक ( हरमल पंचक्रोशी हायस्कूल) तृतीय- सुनीता सावंत( मांद्रे हायस्कूल) उतेजनाथ प्रथम उतेजनाथ- रीया रेडकर( व्हायकाउंट हायस्कूल पेडणे) . नेहा कोरगांवकर ( भगवती हायस्कूल पेडणे) सदर स्पर्धांचे परीक्षण किर्तीमाला परब व कोसेसाव यांनी केले. मुख्याध्यापक नागेश गोसावी यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन पलक करमळकर यांनी केले. बक्षीस वितरण सोहळ्याची जबाबदारी नेहा सावळ तर आभार प्रदर्शन रीमा मोरूडकर यांनी केले , आयोजन व व्यवस्था नेहा सावळ व बाबनी नाईक यांनी केले.