त्वरीत प्रसिद्धीसाठी ‘हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन्स’ला ‘यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी’कडून महत्त्वपूर्ण सेवा पुरविण्याचे कंत्राट प्रदान

.

हे कंत्राट २,१०० कोटी रुपयांपर्यंतचे (२१,००० दशलक्ष रु.) असण्याची शक्यता.
दोन वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी कोट्यवधी पौंड्सचे कंत्राट.
यूकेमधील २,००० जणांना ‘वर्क@होम’ स्वरुपात रोजगार देण्याची कटिबद्धता.
बंगळुरू / लंडन, २० फेब्रुवारी, २०२२ : ‘यूनायटेड किंगडम’मधील (यूके) नागरिकांना निकराच्या वेळी महत्त्वपूर्ण अशी ग्राहकसेवा पुरविण्याकरीता ‘यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी’तर्फे (यूकेएचएसए) ‘एचजीएस यूके लि.’ या आपल्या उपकंपनीची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन्स’ (एचजीएस) (बीएसई व एनएसई येथे सूचीबद्ध) या कंपनीने आज दिली. सेवा पुरविण्याचे हे कंत्राट सुरुवातीस दोन वर्षांसाठीचे आहे आणि या कंत्राटाची मुदत आणखीही वाढू शकते. ही भागीदारी गेल्या आठवड्यात कार्यान्वित झाली. या कंत्राटाचे मूल्य २११ दशलक्ष पौंड (२,१०० कोटी रुपये) इतके असण्याची शक्यता असून या कामासाठी संपूर्ण यूकेमध्ये २,००० जणांना ‘वर्क@होम’ स्वरुपात नेमण्यात येणार आहे.
‘एनएचएस टेस्ट व ट्रेस’ यांबाबतची जबाबदारी ‘यूकेएचएसए’कडे देण्यात आली आहे. कोविड-१९, तसेच फ्ल्यूचा मोठा उद्रेक व नवीन साथीचे आजार यांसारख्या आजारांच्या ट्रेसिंगसाठी भविष्यात संपर्क साधून देण्यात या कंत्राटाची मदत होणार आहे.
या कंत्राटांतर्गत कमाल जितका खर्च होईल, तितके त्या कंत्राटाचे मूल्य असणार आहे. हा खर्च कंत्राटाच्या एकूण मूल्यापेक्षा कमी असू शकतो.
‘एचजीएस’ने गेल्या दशकभरात यूके सरकारसोबत आपली भागीदारी विकसित केली आहे आणि तिचे प्रमाण वाढवलेही आहे. सार्वजनिक क्षेत्रातील हा या कंपनीचा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यूकेमधील या उपकंपनीने त्या देशात सार्वजनिक उपक्रमांमध्ये दिलेल्या योगदानातून आणि उत्कृष्ट सेवेतून हे स्थान प्राप्त केले आहे.
“एचजीएस कंपनी यूकेच्या बाजारपेठेत गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून यशस्वीपणे कार्यरत आहे. मार्च २०२१मध्ये संपलेल्या वर्षात कंपनीचे उत्पन्न ६७ दशलक्ष पौंड इतके होते. डिसेंबर २०२१मध्ये संपलेल्या नऊमाहीत, ‘एचजीएस यूके’ कंपनीने ८७ दशलक्ष पौंड इतके उत्पन्न कमावून ते वर्षाकाठी दुप्पट होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. आमचा सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय हा आमच्या या यशोगाथेच्या केंद्रस्थानी असून त्यांत काही ‘मार्की क्लायंट्स’चेही योगदान आहे. या व्यवसाय विभागात आम्ही कौशल्यवाढीसाठी मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक, आमचे केंद्रित विक्री धोरण, क्लाऊड तंत्रज्ञान आणि वर्क@होम स्वरुपात कर्मचाऱ्यांची नेमणूक या सर्व बाबींमुळे या मोठी मागणी असलेल्या बाजारपेठेत आम्हाला आमची कार्यव्यप्ती वाढवता आली आहे. ‘यूकेएचएसए’शी झालेल्या सहयोगामुळे, आमच्या यूकेमधील व्यवसायात वाढीच्या व जबाबदारीच्या दृष्टीने मोलाची भर पडली आहे,” असे प्रतिपादन ‘एचजीएस’चे कार्यकारी संचालक व समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पार्था देसरकार यांनी यावेळी केले.
‘एचजीएस यूरोप’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅडम फॉस्टर म्हणाले, “कोविडच्या साथीतून सावरण्यात आणि या साथीवर मात करण्यात यूके सरकारला एचजीएस मदत करू शकणार आहे, या घटनेचा मला फार मोठा अभिमान वाटतो. ही संधी आम्हाला मिळाल्याने, गेल्या १० वर्षांत आम्ही यूकेमधील व्यवसायाचा ज्या प्रकारे विस्तार केला, सार्वजनिक क्षेत्रात आम्ही जी कौशल्ये विकसीत केली आणि ज्यातून आम्हाला नावलौकिक मिळाला, त्या सर्व गोष्टींचा हा एक प्रकारे गौरवच होत आहे.”
यूके सरकारने ठेवलेला विश्वास आणि तेथील जनतेला अपेक्षित असलेली उत्कृष्ट स्वरुपाची सेवा देण्याची मिळालेली जबाबदारी, याबद्दल एचजीएस कृतज्ञ आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कौशल्य, वितरण क्षमता व पायाभूत सुविधा यांमध्ये कंपनीची सततची गुंतवणूक, तसेच यूकेमधील सार्वजनिक क्षेत्रातील अवकाशात स्पर्धा करण्याची व अनेक प्रकरणांमध्ये प्रमुख प्रतिस्पर्ध्यांपेक्षाही अद्वितीय कामगिरी करण्याची कंपनीची क्षमता या बाबी या कंत्राटामुळे अधोरेखित झाल्या आहेत.
‘यूकेएचएसए’सोबतची आमची भागीदारी आणि ‘एचजीएस’ला या भागीदारीच्या माध्यमातून देण्यात आलेली जबाबदारी या गोष्टी आम्ही अत्यंत गांभीर्याने हाताळत आहोत. नेमक्या आवश्‍यकता कोणत्या, याचे आम्हाला पुरेसे भान आहे आणि उत्‍तम दर्जाची सेवा देण्‍याच्‍या आमच्या क्षमतेवर आमचा स्वतःचा विश्‍वास आहे,” असे ‘एचजीएस यूके’चे मुख्य महसूल अधिकारी ग्रॅहम ब्राउन यांनी म्हटले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar